एक्स्प्लोर

राज्यात संघटित क्षेत्रात 8 लाख रोजगार उपलब्ध : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजवंदन केल्यानंतर जनतेला संबोधित केलं.

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात ध्वजारोहण झालं. 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी मंत्रालयात ध्वजवंदन केल्यानंतर जनतेला संबोधित केलं. राज्यात मागील एक वर्षात संघटित क्षेत्रात 8 लाख रोजगार उपलब्ध झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. "महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात यावी यासाठी विविध प्रयत्न राज्य सराकरने केले. सरकारने त्यासाठी चांगलं काम केलं आहे. त्याचे दृष्य परिणाम पाहायला मिळाले. गेल्या दोन वर्षात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 42 ते 47 टक्के महाराष्ट्रात आली. त्यासोबत ईपीएफओने संघटित क्षेत्रातील रोजगार निर्मितीची आकडेवारी जाहीर केली, त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त रोजगार निर्माण झाले. मागील एक वर्षात संघटित क्षेत्रात 8 लाख रोजगार निर्माण झाले. त्यातून महाराष्ट्राची आगेकूच सुरु आहे", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन, मोर्चे आणि निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व समाज, जाती, धर्मातील सौहार्द टिकला तरच राज्य पुढे जाईल. महाराष्ट्राचं पुरोगामित्व ही मोठी ताकद आहे, आणि ती टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी राज्यातील विकास योजनांचाही पाढा वाचला. राज्यातील 16 हजार गावं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणीदार केली, हे उद्दिष्ट आता 25 हजार गावांचं असेल. तसंच देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या 42 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. त्यामुळे राज्य प्रगतीपथावर आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.तसंच या माध्यमातून गेल्या एका वर्षात तब्बल 8 लाख लोकांना रोजगार मिळाल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. तर 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकवणं अत्यंत गरज आहे. वंचितांना सोबत घेऊन जाण्याला प्राधान्य असेल. समाज, जाती - धर्मात सौहार्द टिकलं तर महाराष्ट्र पुढे जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसंच महाराष्ट्र एकसंध राहील यासाठी सर्वांंनी प्रयत्न करु असं आवाहन त्यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Embed widget