एक्स्प्लोर

अमेरिकेप्रमाणे भारतीय सैन्यातही पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बदला घेण्याचं बळ : फडणवीस

यापूर्वी फक्त अमेरिका त्यांच्यावरील हल्ल्याचा बदला घ्यायची आणि आत घुसून वार करायची. त्यानंतर आज आपल्या देशाच्या सैन्यातही ते बळ असल्याचं सिद्ध झालंय, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुंबई : मुंबईत भाजपच्या 'कमल ज्योती संकल्प' अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मलबार हिल परिसरातील बाणगंगामध्ये करण्यात आली. यापूर्वी फक्त अमेरिकाच दहशतवादी तळांवर हल्ले करुन नेस्तनाबूत करायची, आज आपल्या देशाच्या सैन्यातही ते बळ असल्याचं सिद्ध झालंय, असं फडणवीस यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारच्या विविध योजना लाभार्थींपर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत लाभार्थींच्या हस्ते कमळाची पणती प्रज्वलित करुन बाणगंगेत सोडण्यात आल्या. भारताने कधीच आपली सीमा वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. पण झालेल्या हल्ल्याचं चोख उत्तर नक्कीच दिले जाईल, याबाबत शंका नाही. आज दहशतवादी तळांवर हल्ला करुन देशाला धोका निर्माण करणाऱ्यांना वायुसेनेने नेस्तनाबूत केलं. यापूर्वी फक्त अमेरिका त्यांच्यावरील हल्ल्याचा बदला घ्यायची आणि आत घुसून वार करायची. त्यानंतर आज आपल्या देशाच्या सैन्यातही ते बळ असल्याचं सिद्ध झालंय, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. 'आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदींनी आपण प्रधानसेवक असल्याचं पंतप्रधानपदी होताच सांगितले होतं. आधीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार होता. 'गरिबी हटाव'चा नारा दिला जायचा, पण कधी परिवर्तन घडताना दिसलं नाही', असं टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी सोडलं. नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा 34 कोटी बँक खाती जनधन योजनेअंतर्गत उघडून दिली. आज या खात्यांमध्ये 80 हजार कोटी रुपये थेट पोहचत आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी सांगितलं होतं, मी 1 रुपया दिल्लीतून पाठवला, तर 25 पैसे लोकांपर्यंत पोहचतात, पण मोदींनी 1 रुपया अख्खा पोहचवण्याची व्यवस्था आणली, असा दावाही फडणवीसांनी केला. 'वन रँक वन पेन्शन' योजना आम्ही लागू केली. या योजनेच्या माध्यमातून 35 हजार कोटी रुपये माजी सैनिकांना मिळवून दिले. मुद्राच्या माध्यमातून 15 कोटी जणांना कर्ज मिळालं, असाही दावा फडणवीसांनी केला. आजच्या कार्यक्रमाचा भाव वेगळा नाही, तर संवेदना प्रकट करण्याचा आहे. यामध्ये दया, उपकाराची भावना नाही, तर सेवा केल्याची भावना आहे. ज्यांच्यापर्यंत योजना पोहचल्या ते दीप प्रज्वलित करुन भावना व्यक्त करत आहेत, असंही फडणवीसांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Kirit Somaiya On Actor Imran Khan: इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Maharashtra BJP : भाजपच्या जुना जाणत्यांना पुन्हा ‘अच्छे दिन’; महाराष्ट्रातील पहिल्या बैठकीत केंद्रीय प्रभारी वैजयंत पांडांनी फर्मान काढलं, म्हणाले...
भाजपच्या जुना जाणत्यांना पुन्हा ‘अच्छे दिन’; महाराष्ट्रातील पहिल्या बैठकीत केंद्रीय प्रभारी वैजयंत पांडांनी फर्मान काढलं, म्हणाले...

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
Embed widget