एक्स्प्लोर

सफाई कामगार संपावर, पनवेल महापालिका क्षेत्रात कचऱ्याचे ढीग

पनवेल : विविध प्रलंबित मागण्यांसाठी पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांनी बुधवार म्हणजे 12 एप्रिलपासून संप पुकारला आहे. सलग सहा दिवस कचरा उचलला न गेल्याने पनवेल, खारघरसह महापालिका क्षेत्रातील विविध भागांना डम्पिंग ग्राऊंडचं स्वरुप आलं आहे. पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडसमधील सहा लाख नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातीत खारघर, कळंबोली, खांदा वसाहत, कामोठे आणि कळंबोली या सिडको नोडसचा यामध्ये समावेश आहे.  मात्र हे नोड्स अद्याप महापालिकेकडे हस्तांतरीत झाले नसल्याने या भागातील दैनंदिन कचरा उचलण्याचं काम सिडकोकडून केलं जातं. सिडकोने त्यासाठी 22 कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांच्या माध्यमातून तब्बल 1300 सफाई कामगार कचरा उचलण्याचं काम करतात. मात्र, प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या मागण्यांसंदर्भात सिडकोकडून अजूनपर्यंत कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या कोकण श्रमिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा निघत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाचे गंभीर परिणाम शहरात जाणवू लागले आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यातून कमालीची दुर्गंधी येत असल्याने रहिवाशांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे. सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खारघरमधील प्रशस्त रस्त्यांना डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यामुळे रहिवाशांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget