CIDCO : सिडकोनं घरबांधणीत रचला इतिहास; 96 दिवसात 96 घरं तयार, नवीन तंत्रज्ञानाचा वापर
CIDCO Home : प्रधानमंत्री आवास योजनेतील 'सर्वांसाठी घरे' हे उद्दिष्ट जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने गृहनिर्माण क्षेत्रात इतिहास रचला आहे.
CIDCO News : सिडकोने घरबांधणीत (CIDCO Home) नवा विक्रम केला असून फक्त 96 दिवसात 96 घरे बांधली आहेत. उलवे येथे सिडकोने 12 मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ 96 दिवसांत पूर्ण केले आहे. याद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतील 'सर्वांसाठी घरे' हे उद्दिष्ट जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने गृहनिर्माण क्षेत्रात इतिहास रचला आहे. उलवे येथील या प्रकल्पाला सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांनी भेट देत याचा आढावा घेतला.
सिडकोने 'मिशन 96' अंतर्गत कमीत कमी वेळात बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले होते. त्यानुसार कंत्राटदार मे. लार्सन ॲन्ड टुब्रो यांनी उलवा बामण डोंगरी येथे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासह सुरक्षित आणि मजबूत घरे बांधण्याकरिता प्री फॅब्रिकेट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढे जलदगतीने घरांची उभारणी करून 1 लाख घरांचे उद्दिष्ट सिडको गाठणार आहे.
डॉ.संजय मुखर्जी यांनी सांगितलं की, मिशन 96 च्या निमित्ताने नियंत्रित वातावरणात, मजला बांधणीचा कालावधी कमी करण्यासह कमी मनुष्यबळाच्या उपलब्धतेसह उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यासाठी प्रीकास्ट तंत्रज्ञान किती सक्षम आहे हे सिद्ध झाले आहे.
सिडकोने प्री कास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून 96 सदनिका असणार्या 12 मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ 96 दिवसांत पूर्ण केले आहे. याद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने गृहनिर्माण क्षेत्रात इतिहास रचला आहे.
सिडकोने मिशन 96 अंतर्गत कमीत कमी वेळात बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले होते. त्यानुसार कंत्राटदार मे. लार्सन न्ड टुब्रो यांनी बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासह सुरक्षित आणि मजबूत घरे बांधण्याकरिता प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून, 96 सदनिका असणार्या 12 मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ 96 दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. 4 एप्रिल 2022 रोजी सुरू झालेले 12 मजली इमारतीचे बांधकाम 9 जुलै 2022 रोजी पूर्ण करण्यात आले. रेरा कायद्यातील वेळेत बांधकाम पूर्ण करण्याच्या मानकाचे देखील पालन करण्यात आले आहे.
प्रीकास्ट तंत्रज्ञान काय आहे...
या प्रकारच्या बांधकामामध्ये वास्तुशास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण फिनिशिंग करण्यासह सुपरस्ट्रक्चरवर जोर दिला जातो. प्रीकास्ट घटकांचे उत्पादन आणि इन्स्टॉलेशन करणे आणि 64,000 चौ. फुट बांधीव क्षेत्रावर यांत्रिक, विद्युत, नळकाम विषयक कामे (एमईपी) कामांचा समावेश होता. बांधकाम तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बांधकामाच्या प्रगतीवर देखरेख करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येतो.