एक्स्प्लोर

विश्वास पाटलांची चौकशी सीआयडी करणार!

याप्रकरणातील 137 पैकी 33 फाईल्समध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध झालं आहे, असं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत सांगितलं.

मुंबई: माजी सनदी अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांच्यावरील एसआरए घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी, आता सीआयडी करणार आहे. याप्रकरणातील 137 पैकी  33 फाईल्समध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध झालं आहे, असं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत सांगितलं. मात्र महत्त्वाचं म्हणजे विश्वास पाटील प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईल गहाळ झाली आहे, अशी धक्कादायक माहिती रवींद्र वायकर यांनी दिली. याबाबत  निर्मलनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. याप्रकरणाची सीबीआय, सीआयडी किंवा एसीबीकडून चौकशी करण्याची मागणी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. पानिपतकारांवर चौकशी समितीचा ठपका विश्वास पाटील यांनी सेवानिवृत्ती आधी SRA म्हणजेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या कार्यालयात अक्षरशः धुमाकूळ घालत विकासकांना हव्या तशा मंजुऱ्या दिल्याचा ठपका, चौकशी समितीने ठेवला आहे. पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीने यापूर्वी पाटील यांच्यावर झालेल्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर या समितीला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या समितीने आपल्या अहवालात विश्वास पाटील यांनी जूनमध्ये निवृत्तीआधी घातलेला धुमाकूळ स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. एसआरए घोटाळ्याचा आरोप मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी असतानाच्या आपल्या कार्यकाळात मालाड येथील एका विकासकाला नियमबाह्य पद्धतीने फायदा करून दिल्याबद्दल विश्वास पाटील आणि इतरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. फायदा करून दिलेल्या विकासकाच्या कंपनीत विश्वास पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांना संचालकपदी नेमण्यात आलं होतं. त्यामुळे इथं मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. संबंधित बातम्या 'पानिपत'कारांवर 'झोपु' घोटाळ्याचा ठपका, चौकशी अहवाल सादर! विश्वास पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका  विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा : कोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Rohit Pawar and Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
Embed widget