एक्स्प्लोर

11 महिन्यांच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत सेफ्टी पिन अडकली!

मुलगी लहान असल्यामुळे ती फारच अस्वस्थ होत होती. तिला गुंगीचं सौम्य डोस देण्यात आलं. अन्ननलिकेत अडकलेली पिन तोंडातून काढण्यास अडथळा येत असल्यामुळे डॉक्टरांनी लगेचच एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला.

भाईंदर : भाईंदरमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या 11 महिन्यांच्या मुलीने खेळताना सेफ्टी पिन गिळल्याने परिस्थिती मोठी चिंताजनक झाली होती. ती चिमुरडी रडूही शकत नव्हती. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे मुलीच्या अन्ननलिकेतून सेफ्टी पिन काढण्यात यश आले. …अन् पिन गळ्यातून काढली! भायंदर येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या 11 महिन्यांच्या चिमुकलीने 24 नोव्हेंबरला घरामध्ये खेळत असताना सेफ्टी पिन गिळली. त्यानंतर तिला लगेचच मिरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर लहान मुलांचे गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. ललित वर्मा यांनी ही केस आपल्या हातात घेतली. एक्सरेमध्ये लक्षात आलं की, ही सेफ्टी पिन लहान मुलीने अन्ननलिकेच्या मार्गाने  गिळली. तर या सेफ्टी पिनांची वरील बाजू उघडी असल्यामुळे चिमट्याच्या मदतीने ती काढणं फारच कठीण आहे. मुलगी लहान असल्यामुळे ती फारच अस्वस्थ होत होती. तिला गुंगीचं सौम्य डोस देण्यात आलं. अन्ननलिकेत अडकलेली पिन तोंडातून काढण्यास अडथळा येत असल्यामुळे डॉक्टरांनी लगेचच एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. एन्डोस्कोपीच्या मदतीने प्रथम ती पिन अन्ननलिकेतून पोटात घेतली आणि नंतर ती पिन उलटी केली म्हणजेच तिचा पाठचा भाग वरती आणला, रॅट टूथ व हूड च्या सहाय्याने अन्ननलिकेतून बाहेर काढली. ही सेफ्टी पिन काढल्यानंतर मुलीला 24 तास निरिक्षणाखाली ठेवलं आणि त्यानंतर तिला घरी ही सोडण्यात आलं. सिटी स्कॅन व स्कोप केल्यानंतर मुलीला कोणताही गंभीर इजा झाली नव्हती व योग्य व तत्काळ उपचारांच्या मदतीने तिचे प्राण वाचवण्यात आल होतं. “मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये लहान मुलांनी  पेन्सिल अथवा खोडरबर गिळणे अथवा छोटी बॅटरी अन्ननलिकेत  अडकणे अशा अनेक केसेस ठाणे व पालघर जिल्ह्यातून येत असतात. परंतु अशा प्रकारे सेफ्टी पिन गळ्यात अडकण्याची ही पहिलीच केस असून, तिच्यावर आम्ही  यशस्वी उपचार केले आहेत. अशा केसेसमध्ये पालकांनी लगेचच त्या मुलाला अथवा मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे जेणेकरून त्यांच्यावर लगेच उपचार सुरु होतील आणि लहान मुलांच्या जवळच्या खेळण्याच्या वस्तू ही जपाव्यात. तर घरात पसरणारे केस ही लहानग्याच्या तोंडात गेल्यावर मुलं आजारी पडू शकतो.” असे वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवानी यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Embed widget