एक्स्प्लोर
दाऊदच्या मुलानंतर छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर
छोटा शकीलचं तिसरं अपत्य आणि सर्वात धाकटा मुलगा 18 वर्षीय मुबशिर शेखने नुकतंच 'हाफिज-ए-कुराण' बनून खळबळ माजवली आहे.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एकुलत्या मुलाने आध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये 'हाफिज-ए-कुराण' म्हणजेच मौलाना बनला आहे. याआधी एक वर्षापूर्वी दाऊदच्या मुलानेही आध्यात्माची कास धरली होती.
छोटा शकीलचं तिसरं अपत्य आणि सर्वात धाकटा मुलगा 18 वर्षीय मुबशिर शेखने नुकतंच 'हाफिज-ए-कुराण' बनून खळबळ माजवली आहे. हाफिज-ए-कुराण म्हणजे ज्याला संपूर्ण कुराण तोंडपाठ आहे. कुराणमध्ये 6,236 आयतांचा समावेश आहे. मुबशिरने आता कुराणचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली आहे.
कराचीमध्ये तो वडील बाबू मियां शकील अहमद शेख उर्फ छोटा शकीलसोबत राहतो. छोटा शकीलला दाऊदच्या 'डी कंपनी'चा मुख्य कर्ताधर्ता समजलं जातं. दाऊद इब्राहिमचा मुलगा मोईनही धर्मगुरु बनला आहे. तो मौलाना बनल्याने दाऊद नैराश्येत होत, असं त्याचा भाऊ इब्राहिम कासकरने सांगितलं होतं.
मोईनप्रमाणे मुबशिरलाही आपल्या वडिलांच्या गुन्हे आणि दहशतवादी कारवायांमध्ये रस नाही. त्यामुळे दाऊद आणि त्याच्या हस्तकांनी उभा केलेला भलामोठा व्यापार आणि गुन्हेगारी साम्राज्याचा वारस कोण असेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुबशिरसह छोटा शकीलला झोया आणि अनम या दोन मुली असून दोघींनीही कराचीमधील डॉक्टरांसोबत लग्न केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
सोलापूर
नाशिक
Advertisement