एक्स्प्लोर
छगन भुजबळ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार!
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासंदर्भात महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असलेल्या छगन भुजबळांनी पीएमएलए कोर्टाकडे अर्ज केला होता. भुजबळांचा अर्ज कोर्टानं स्विकारल्यानं त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. 30 जून) पीएमएलए कोर्टाकडे केली होती. भुजबळांच्या या विनंती अर्जाला ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी विरोध केला होता.
पण पीएमएलए कोर्टानं भुजबळांच्या अर्जाचा स्विकार केल्यानं, त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
दरम्यान, 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने मीरा कुमारी यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं या आधीच मीरा कुमारी यांना पाठिंबा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement