एक्स्प्लोर
छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमधून जे. जे. हॉस्पिटलला हलवलं!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची रवानगी जे. जे. रुग्णालयात करण्यात आली आहे. मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळांवर उपचार सुरु होते. आता बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांना जेजे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये फिरत असल्याची तक्रार ईडीकडे आली होती. त्यानंतर ईडीकडून बॉम्बे हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात आली. आता त्यांना जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला आहे. मात्र, प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement