एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जे.जे. हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी नको!: छगन भुजबळ
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या छगन भुजबळांनी अँजिओग्राफी करण्यात येणार होती. पण त्यांनीच याला नकार दिल्याने त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड कारागृहात करण्यात येणार आहे.
छगन भुजबळ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 2 नोव्हेबंर रोजी त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. यानंतर हॉस्पिटलचे वरिष्ठ कार्डीयोलॉजिस्ट डॉ. बी.के. गोयल यांनी त्यांना अजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला.
याच काळात बॉम्बे हॉस्पिटलचा त्यांचा मुक्काम वादग्रस्त ठरल्याने, त्यांना 7 डिसेंबर रोजी जे. जे. हॉल्पिटलमध्ये हालवण्यात आले. यानंतर जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते.
यानंतर त्यांच्या अँजिओग्राफीसंदर्भात अर्थर रोड कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी विचारले असता, त्यांनीच नकार दिल्याचे सूचक वक्तव्य तात्याराव लहाने यांनी केले. त्यानंतर कोणावरही आपण जबरदस्ती करु शकत नसल्याचे पत्राद्वारे कळवले होते. त्यामुळे त्यांची त्यांची रवानगी पुन्हा अर्थररोड कारागृहात करण्यात येणार आहे.
दरम्यान, छगन भुजबळ हे विराट कोहलीप्रमाणेच फिट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
संबंधित बातम्या
छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमधून जे. जे. हॉस्पिटलला हलवलं!
भुजबळांची रवानगी कोणाच्या सांगण्याने, डॉ. लहानेंचं उत्तर
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ 26 जणांना भेटले : ईडी
भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भेटेलेले ‘ते’ 26 जण कोण? CCTV फुटेज 'माझा'च्या हाती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भविष्य
निवडणूक
निवडणूक
Advertisement