एक्स्प्लोर

सततच्या आगींमुळे भिवंडीचं भोपाळ होतंय?

सततच्या आगीमुळे भिवंडीचं भोपाळ होतंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या परिसरातल्या केमिकल कंपन्या सातत्यानं आगीच्या भक्षस्थानी पडत असल्याने भिवंडीतील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

भिवंडी : सततच्या आगीमुळे भिवंडीचं भोपाळ होतंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या परिसरातल्या केमिकल कंपन्या सातत्यानं आगीच्या भक्षस्थानी पडत असल्याने भिवंडीतील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. भिवंडीत आज पूर्णा गावातील श्रीराम कंपाऊंडमधल्या रौनक वेअरहाऊस या केमिकल गोदमाला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग इतकी भीषण होती की, त्यावर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाकडून यश आलं असं सांगण्यात येत होतं. पण अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं नसल्याचं सांगण्यात येत होतं. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. त्यातच केमिकलमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचीही माहिती आहे. या आधीही फेब्रुवारीमध्ये एका गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीत चारजणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. तर 3 मार्च रोजी एका कापडाच्या मिलला भीषण आग लागली होती. 2014 मध्ये तर एका लाकडी गोदामाला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. वास्तविक, भिवंडी आणि आसपासच्या परिसरात अनेक केमिकल कंपन्या आहेत. या केमिकल कंपन्यांमध्ये आगीच्या घटना वाढत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासानाची यंत्रणा नाही. आग लागल्यानंतर नेहमी ठाणे, कल्याण, उल्हासनगर आदी भागातून आग्निशमन दलाला पाचारण करावं लागतं. त्यामुळे पूर्णा, राहनाळ, काल्हेर, कशेळी, वळ, दापोडे आदी भागातील सुमारे 500 हून अधिक कुटुंबांना आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागतं आहे. शिवाय या परिसरात शाळा आणि रुग्णालयांची संख्याही मोठी आहे. तेव्हा प्रशासनानं वेळीच दक्षता घेतली नाही, तर केमिकल गळतीमुळे मोठी दुर्घटना घटण्याची भीती स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Wildlife Board : महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget