एक्स्प्लोर
'सरसकट कर्जमाफी म्हणजे नेमकं काय?', शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना प्रश्न
मुंबई: राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणते निकष असावेत, निर्णयाची अंमलबजावणी कशी व्हावी याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत अजित पवार आणि जयंत पाटीलही उपस्थित होते.
यावेळी पवारांनी सरसकट कर्जमाफी म्हणजे नेमकं काय? याबाबत प्रश्न उपस्थित केले. राज्य सरकारनं केलेल्या कर्जमाफीबाबत राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांची मतं जाणून घेतली जात आहेत. ही बैठकही याच प्रक्रियेचा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर ‘सरसकट’, ‘तत्वत:’ आणि ‘निकष’ या तीन शब्दांवरुन सोशल मीडियापासून ते अगदी शरद पवारांपर्यंत सर्वांनीच टीका केली.
संबंधित बातम्या:
सरसकट कर्जमाफीसाठी जमिनीची कोणतीही अट नाही : चंद्रकांत पाटील
‘तत्वत:’, ‘सरसकट’ आणि ‘निकष’ म्हणजे काय?, चंद्रकांतदादांचं उत्तर
जेटली म्हणाले, तुमचा निधी तुम्हीच उभारा, पाटील म्हणाले आम्ही समर्थ!
धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवणार
अल्पभूधारक, मध्यम भूधारक आणि मोठे शेतकरी म्हणजे कोण?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement