एक्स्प्लोर
चंद्रकांत पाटील भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तर मंगलप्रभात लोढा मुंबई अध्यक्ष
केंद्रात मंत्री बनल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दानवे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला आता चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे.
नवी दिल्ली : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर मुंबई अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती झाली आहे. भाजपने यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.
चंद्रकांत पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
केंद्रात मंत्री बनल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी दिल्लीत राजीनाम्याची घोषणा केली. दानवे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला आता चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे.
मंगलप्रभात लोढा मुंबई अध्यक्ष
तर मुंबईच्या अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची वर्णी लागली आहे. आशिष शेलार यांची राज्यातील फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदी नियुक्ती झाल्यावर, मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सोपवली आहे.
ऑक्टोबरमध्ये निवडणूक?
महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर ऑक्टोबर मध्यापर्यंत विधानसभा निवडणूक होतील, असं म्हटलं जात आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांना केंद्रात तर मुंबई अध्यक्षांना राज्यात मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे 'एक व्यक्ती एक पद' या नियमानुसार पक्ष नव्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदाचा शोध वेगाने सुरु होता.
भाजप कार्यकारिणीची बैठक
मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोमध्ये 21 जुलै रोजी भाजप कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीत सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी सामील होणार आहेत. बैठकीला भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची समजली जात आहे. त्यादृष्टीने भाजपच्या नव्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement