एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीलाच याचिकेद्वारे आव्हान
तीन महिन्यांपूर्वीच संदीप शिंदे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. अॅड. उल्हास नाईक यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
तीन महिन्यांपूर्वीच संदीप शिंदे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. याआधी अनेक महत्त्वाच्या खटल्यांत त्यांनी हायकोर्टातील मुख्य सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिलंय. ज्यात अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याचाही समावेश होता.
न्यायमूर्ती संदीप शिंदे हे याआधी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली होती. तसेच मुख्य सरकारी वकील असताना संशयास्पद कारभार आणि गैरवर्तन या कारणांकरता याआधी दोनवेळा त्यांची अतिरीक्त न्यायमूर्ती पदासाठीची नियुक्ती नाकारण्यात आली होती, असा आरोप या याचिकेत करण्यात आलाय.
त्यामुळे आता ही नियुक्ती नेमकी कोणत्या आधारे करण्यात आली, असा सवाल या याचिकेतून विचारण्यात आला आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या गुप्तचर विभागाला तसेच विधी आणि न्याय विभागाला उत्तर देण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement