एक्स्प्लोर

चादर गँगचा धुमाकूळ, दुकान फोडत उल्हासनगरात लाखोंचे मोबाईल लंपास

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकात दिवसरात्र पोलीस असतात, मात्र तरीही ही चोरी झाली. त्यामुळं आता पोलीस आपली अब्रू वाचवण्यासाठी काय करतात, हे बघावं लागेल.

कल्याण : कल्याणनंतर आता व्यापारी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरमध्येही चादर गँग सक्रिय झाली आहे. या गँगनं उल्हासनगरचं एक मोबाईल दुकान फोडत त्यातून तब्बल 46 लाख रुपयांचे मोबाईल लंपास केले आहेत. उल्हासनगरच्या गजबजलेल्या शिवाजी चौकात एक मोठं मोबाईलचं दुकान आहे. या दुकानात आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दुकानाबाहेर घुटमळत उभ्या असलेल्या सहा जणांच्या टोळीनं अचानक चादर उघडली आणि त्यामागे लपत शटर उचकटून एक चोरटा दुकानात शिरला. या चोरट्यानं दुकानात असलेले ऍपल, सॅमसंग, विवो आणि अन्य कंपन्यांचे तब्बल 46 लाख रुपयांचे मोबाईल चोरले आणि पोबारा केला. सकाळी 10 च्या सुमारास दुकानाचे कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. या घटनेनंतर दुकानाचे मालक लक्ष्मण ब्रम्हानी यांनी पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकात दिवसरात्र पोलीस असतात, मात्र तरीही ही चोरी झाली. त्यामुळं आता पोलीस आपली अब्रू वाचवण्यासाठी काय करतात, हे बघावं लागेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ब्रम्हानी यांनी दिली. कल्याणमध्येही सध्या चादर गँगची दहशत पसरल्याचं पाहायला मिळत आहे. ही गँग दुकानाच्या शटरसमोर चादर धरुन अवघ्या काही मिनिटात हात साफ करुन जाते. चार जण एका दुकानाबाहेर येतात, त्यातला एक जण चादर झटकण्याचं नाटक करतो, तर तिघे शटर उचकटतात, याचवेळी त्यांच्यातला एक जण आत जातो आणि आरामशीर दुकान साफ करुन पुन्हा तशाच पद्धतीने बाहेर येतो. कल्याणमध्ये अशाप्रकारे केलेल्या चोरीत एका दुकानातून 18 लाखांचे आयफोन आणि दोन लॅपटॉप, तर दुसऱ्या दुकानातून पाच लाखांचे मोबाईल चोरी करण्यात आले आहेत. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ आणि एमएफसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गँगचा शोध घेणं हे सध्या पोलिसांसमोर आव्हान बनलं असून व्यापाऱ्यांमध्ये यामुळे धास्ती पसरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
Embed widget