एक्स्प्लोर
मुंब्र्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई: कळवा आणि मुंब्र्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळं मध्य रेल्वेची स्लो ट्रॅकरवरची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल कळवा रेल्वे स्थानकाजवळ रखडल्या आहेत. रात्री सव्वा नऊ वाजता कळवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याचं निदर्शनास आलं. अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेची स्लो ट्रॅकवरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. दरम्यान, आज सकाळीही मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता. कल्याण स्थानकादरम्यान पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीरानं धावत होत्या.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























