एक्स्प्लोर
केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोलीजवळ अपघात झाला.
मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोलीजवळ अपघात झाला. या अपघातात गिते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. गिते सुखरुप आहेत.
गिते हे खोपोलीकडून पालीकडे जात होते. त्यावेळी पालीजवळ हा अपघात झाला.
गिते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट गाडीसमोर दुचाकीस्वार आडवा आला. त्यामुळे पोलिसांच्या गाडीचा अचानक ब्रेक दाबण्यात आला.
त्यामुळे मागे असलेली गिते यांच्या गाडीने समोरील पायलट व्हनला धडक दिली. तर गिते यांच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका पायलट व्हॅनने गिते यांच्या गाडीला धडक दिली.
या अपघातात गिते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली.
अनंत गिते हे रायगडमधील शिवसेनेचे खासदार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement