एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Plasma therapy | पूल टेस्टिंग व प्लाज्मा थेरपीला केंद्राची मान्यता; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पूल टेस्टिंग (Pool Testing) व प्लाज्मा थेरपीला (Plasma Therapy) राज्यात मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पूल टेस्टिंग (Pool Testing) व प्लाज्मा थेरपी (Plasma Therapy) या मागणीला केंद्राने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिली. महाराष्ट्र सरकारने राज्याने केलेल्या उपाययोजनांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कौतुक केलं.
देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि सचिवांची बैठक घेतली. यात सर्व राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. काही दिवसांपासून राज्यात पूल टेस्टिंग (Pool Testing) व प्लाज्मा थेरपी (Plasma Therapy) करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीला मान्यता मिळाली असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सोबतचं Portable Pulse Oxymeter व Portable X Ray Daignosis ची मदत घेऊन लवकर रुग्ण निदान करून मृत्यूदर कमी करणे. पीपीई (PPE) चे Sterlization करून पूनर वापर करण्यासाठी सुचविलेल्या मुद्द्यांचे विशेष कौतुक केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टेस्टिंग लॅब सुरू करण्याच्या मागणीला प्रतिसाद दिल्याचेही टोपे यांनी सांगितले.
काय आहे प्लाज्मा थेरपी?
- यात अँटीबॉडीचा वापर केला जातो. त्यामुळे याला प्लाज्मा थेरपी तसंच अँटीबॉडी थेरपी म्हटलं जातं
- ज्या व्यक्तीला विषाणूची लागण झालेली असते आणि त्यातून तो पूर्ण बरा होतो अशा व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात
- अँटीबॉडीच्या भरवशावरच रुग्ण बरा होतो
- विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्ण जेव्हा बरा होतो तेव्हा त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात
- बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडी काढून दुसऱ्या आजारी रुग्णाच्या शरीरात टाकल्या जातात
- अँटीबॉडी शरीरात प्रवेश करताच रुग्णाच्या प्रकृतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन विषाणूचा प्रभाव कमी होऊ लागतो
- अँटीबॉडीमुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढीस लागते
- जे रुग्ण बरे होतात त्यांच्या शरीरातून अस्पेरेसिस तंत्रज्ञानाच्या आधारे रक्त घेतलं जातं.
- डॉक्टरांच्या माहितीनुसार अँटीबॉडी रक्ताच्या प्लाज्मामध्ये असतात.
- दात्याच्या शरीरातून 800 मिलीलीटर प्लाज्मा घेतला जातो.. ज्याचा उपयोग 3 ते 4 रुग्णांमध्ये होतो
- या प्लाज्माच्या माध्यमातून कोविडच्या रुग्णांमध्ये ट्रान्सफ्यूजन केलं जातं
- ज्या माध्यमातून रुग्णाच्या शरीरात विषाणूविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज पोहोचवल्या जातात
- अँटीबॉडीज अक्टिव होऊ लागल्यानंतर विषाणू कमजोर होऊ लागतो
- कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला रुग्ण
- कोरोनातून बरा झाल्यानंतर 14 दिवस कुठलीही लक्षणं न दिसून आलेला रुग्ण
- थ्रोट आणि नेजल स्वॅब तीनवेळा निगेटिव्ह आल्यानंतर प्लाज्मा डोनेट करु शकतो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement