एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जीव्हिकेचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डींवर गैरव्यवहाराचा आरोप; सीबीआयकडून गुन्हा दाखल
एफआयआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार या सर्व आरोपींनी मिळून 2012-2018 या कालावधीत 805 कोटींचा घोटाळा करून सार्वजनिक तिजोरीला तोटा पोहचवल्याचा आरोप जीव्हिकेचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डींवर आहे.
मुंबई : जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी यांच्यावर 805 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने दाखल केलेल्या या एफआयआरमध्ये जीवीके रेड्डी, जीवी संजीव रेड्डी सह, अथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी आणि इतर नऊ खासगी कंपन्यांचीही नावे आहेत.
एफआयआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार या सर्व आरोपींनी मिळून 2012-2018 या कालावधीत 805 कोटींचा घोटाळा करून सार्वजनिक तिजोरीला तोटा पोहचवल्याचा आरोप आहे.
प्राथमिक तपासानंतर एफआयआरमध्ये असा आरोप केला आहे की साल 2017-2018 मध्ये या सर्व आरोपींनी एअरपोर्ट दुरुसती आणि डेव्हल्पमेंट कामांसाठी 310 कोटीचे बोगस कॉनट्रॅक्ट केले आणि हे पैसे भारता बाहेर परदेशात वेग वेगवेगळ्या कंपनींमध्ये गुणतवले.
एफआयआरनुसार, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड किंवा एमआयएएल नावाची जॉइंट व्हेंचर कंपनी जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड, एअरपोर्ट अथॉरिटी इंडिया आणि इतर काही विदेशी संस्थांनी तयार केली होती. जीव्हीकेचे 50%. टक्के शेअर्स होते तर 26% एएआयकडे आणि इतर शेअर्स उर्वरीत कंपन्यांच्या नावावर होते.
सीबीआयचा असा ही आरोप आहे की 2012-2018 या कालावधीत जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीज ने एमआयएएलचे 395 कोटींचे सर्प्लस फंड आपल्या खाजगी कंपनीमध्ये लावून तिजोरीला तोटा पोचवला. त्याच बरोबर जीव्हीके ने एअरपोर्ट डिवेलप्मेंट आणि मेंटेन्ससाठी वाढीव खर्च दाखवून आणखी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला.
जीव्हीके रेड्डी एमआयएएलचे अध्यक्ष आहेत आणि एमआयएएलचे व्यवस्थापकीय संचालक जीव्ही संजय रेड्डी यांचेही एफआयआरमध्ये नाव आहे.
2006 मध्ये एएआय आणि एमआयएएल दरम्यान झालेल्या करारामध्ये असे म्हटले आहे की एमआयएएल मुंबई विमानतळ चालवेल आणि त्यांना त्यांच्या उत्पन्नातील 38.7 टक्के वाटा एआयएकडे वार्षिक फी म्हणून भाग करावा लागेल. उर्वरित भाग विमानतळाच्या आधुनिकीकरण, ऑपरेशन आणि देखभाल यासाठी वापरला जाईल.
तक्रारीनुसार हा घोटाळा 805 कोटीचा पेपरवर आहे. परंतु या आरोपींनी त्याच कालावधीत एमआयएएलचा कमी महसुल दाखवून आणखी 200 घोटाळा केल्याचही माहिती मिळते आहे. ज्याचा तपास सीबीआय करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement