अमिताभ गुप्ता यांची CBI चौकशी करा; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
लॉकडाऊनच्या काळात सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधु यांना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी प्रवासी पास दणारे विशेष गृहसचिव आमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आलंय. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतलाय.
मुंबई : देशात लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वाधवान कुटुंबियांना प्रवासासाठी परवानगीचं पत्र देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांची पुन्हा त्याच जागी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवासी यांनी आक्षेप घेतला आहे. सरकारच्या आशिर्वादाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नसल्याचा आरोप करत अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशीची मागणी फडणवीस यांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधु यांना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी प्रवासी पास दणारे विशेष गृहसचिव आमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आलं आहे. यावर अशा प्रकारचा पास कोणताही अधिकारी आपल्या भरवश्यावर देऊ शकत नाही. जोपर्यंत सराकरमधील किंवा सरकार चालवणारे प्रमुख लोक आशिर्वाद देत नाही किंवा इशारा देत नाही तोपर्यंत ही गोष्ट घडणे शक्य नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. म्हणूनच अमिताभ गुप्ता यांनी क्लिनचिट मिळाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
वाधवान कुटुंबियांना पत्र दिल्याचं अमिताभ गुप्तांकडून कबूल, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती
वाधवान कुटुंबियांना पत्र दिल्याचं अमिताभ गुप्तांकडून कबूल मागच्या महिन्यांपूर्वी देशात लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वाधवान कुटुंबियांना परवानगीचं पत्र दिल्याचं विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी कबूल केलं असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तोपर्यंत अमिताभ गुप्ता यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. चौकशीमध्ये त्यांना क्लिनचीट मिळाली असून गुप्ता यांची पुन्हा त्याच जागी नियुक्ती करण्यात आलीय.
लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाचा महाबळेश्वरपर्यंत प्रवास बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधू कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. महत्त्वाचं म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु, वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतलं नव्हतं. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका असल्याने सीबीआयने अख्ख्या कुटुंबाला क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता.
#WadhwanCase | वाधवान प्रकरणी अमिताभ गुप्तांकडून पत्र स्वत: दिल्याचं कबूल, गृहमंत्र्यांची माहिती