एक्स्प्लोर

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, छगन भुजबळांची विधानसभेत मागणी, विरोधकांकडून मागणीला समर्थन

ओबीसी जनगणनेसाठी ठाकरे सरकारच्या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी देखील पाठिंबा दिला आहे. यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन तोडगा काढण्याची तयारी त्यांनी दिली आहे.

मुंबई : ओबीसी जणगणनेचा राज्य विधानसभेचा प्रस्ताव केंद्र सरकारनं फेटाळला आहे. मात्र असं असतानाही ओबीसींची जातिनिहाय जनगणना करा अशी मागणी ओबीसी नेते आणि कॅबिनेट मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी केली आहे. राज्य सरकारनं याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा असंही भुजबळ म्हणाले. दरम्यान, भुजबळांच्या या मागणीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन दिलं आहे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते मिळून मोदींची भेट घेऊ असंही फडणवीस म्हणाले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याबाबत राज्य विधानसभेनं केलेला ठराव केंद्र सरकारने फेटाळला आहे, अशी माहिती विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. मागील अधिवेशनात स्वतः नाना पटोले यांनी हा ठराव मांडला होता. तो विधानसभेनं एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला होता.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत मांडली. राज्य सरकारने पुन्हा याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. भुजबळ यांच्या मागणीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिलं. यासाठी आपण राज्याचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलं पाहिजे. ओबीसींसाठी योजना, कार्यक्रम आखण्यासाठी स्वतंत्र जनगणना होणं गरजेचं आहे, असं फडणवीस म्हणाले.

2011 साली जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय झाला होता, पण तेव्हाच्या जनगणनेत हे होऊ शकलं नाही अशी माहिती भुजबळ यांनी विधानसभेत दिली. यावर आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जाऊन पंतप्रधानांना भेटूया, असं फडणवीस म्हणाले. OBC जनगणना करण्या बरोबरच इतर जातीनिहाय जनगणना ही व्हावी अशी आमची मागणी आहे यामुळे सर्व जातीजमातींचे प्रश्न सोडविणे शक्य ही होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Mumbai Crime News: मुंबईतील टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांचा दणका, अंधेरीमधील खासगी प्लॉट कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांचा दणका, अंधेरीमधील खासगी प्लॉट कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Mumbai High Court On Tukaram Mundhe FDA: हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget