एक्स्प्लोर

कॅगच्या अहवालात सिडकोच्या कामावर गंभीर ताशेरे, फडणवीस सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

आघाडी सरकारच्या तुलनेत फडणवीस सरकारच्या काळात पायाभूत सुविधांचा कामावर मोठ्या प्रमाणावर खर्च वाढला असल्याचे या अहवालात म्हटलं आहे. सिडकोच्या अनेक कामांमध्ये अनियमितता असल्याचे या अहवालात म्हटलं आहे.

मुंबई : कॅगच्या अहवालामध्ये सिडकोच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॅगचा अहवाल आज विधानसभेत मांडला. त्यात भाजप सरकारच्या कारभारावर ठपका ठेवला आहे. यामध्ये नवी मुंबई विमानतळ, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे. तर सिडकोने पायाभूत सुविधा कामावर केलेला खर्च 2013-14 मधील 706.04 कोटींवरून 2017-18 मध्ये 920.10 कोटी रुपयांनी म्हणजे तब्बल 30 टक्क्यांनी वाढला असल्याचे देखील अहवालात म्हटलं आहे. हा खर्च अंदाजपत्रकाच्या तुलनेत जवळ जवळ 61 टक्के इतका होता, असं देखील यात म्हटलं आहे. दरम्यान याविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, कॅगच्या अहवालात 2013 एप्रिलपासून 2018 पर्यंतच्या सिडकोच्या विविध कामांचे अवलोकन केलेलं आहे. रिपोर्ट येण्याआधीच सिलेक्टिव्ह लिकेज झालं ते सुद्धा आक्षेपार्ह आहे, असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. आज अजित पवार यांनी कॅगचा अहवाल विधानसभेत मांडला. या अहवालात अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. 50 कोटींपेक्षा जास्त कामाच्या 16 निविदा राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रात जाहिराती न देता काढता देण्यात आल्या असल्याचं यात म्हटलं आहे.

फडणवीस सरकारच्या काळात सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा, कॅगचा ठपका

तसेच 890 कोटींची कामे अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. त्यांच्याकडे या कामाचा कोणताही अनुभव नव्हता. तर 430 कोटी रुपयांच्या 10 कामात निविदांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले आहे, असा ठपका देखील अहवालात ठेवण्यात आला आहे. यातील 70 कोटींची अतिरिक्त कामे निविदा न मागवता देण्यात आली आहेत. त्यात पारदर्शकता नव्हती. तर 15 कोटींपेक्षा जास्त किमतींची सात कामे देताना तांत्रिक मूल्यांकन करताना गोंधळ दिसून आला आहे, असं अहवालात म्हटलं आहे. नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील कामात टेकडी कापण्यासाठी 2033 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याच टेकडीपासून निघालेल्या दगडांनी भरणा केला आहे. तरी देखील भरणा करण्याच्या कामासाठी 22.08 कोटी खर्च झाल्याचे दाखवले आहे. कामाच्या विलंबसाठी कंत्राटदाराकडून 186 कोटी रुपये वसूल करायला हवे होते मात्र सिडकोने ते वसूल केलेले नाहीत, असं देखील या अहवालात म्हटलं आहे. रिपोर्ट येण्याआधीच सिलेक्टिव्ह लिकेज आक्षेपार्ह : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दरम्यान फडणवीस सरकारच्या काळात कॅगच्या अहवालात अनियमितता असल्याचे म्हटल्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कॅगच्या अहवालात 2013 एप्रिलपासून 2018 पर्यंतच्या सिडकोच्या विविध कामांचे अवलोकन केलेलं आहे. हा अहवाल येण्याआधीच सिलेक्टिव्ह लिकेज झालं तेसुद्धा आक्षेपार्ह आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, तीन इन्फ्रा प्रोजेक्ट्सच्या कामांचा यात उल्लेख आहे. नवी मुंबई मेट्रो रेल, नेरुळ-उरण रेल्वे आणि नवी मुंबई एअरपोर्टच्या टेंडर संदर्भात बाबींवर आक्षेप घेतले आहेत. यातले नवी मुंबई मेट्रो रेल आणि नेरुळ-उरण रेल्वे या दोन्ही प्रकल्पाच्या सर्व निविदा आणि निर्णय 2014 पूर्वीचे आहेत. त्या काळात टेंडर ऑगस्ट 2014 ते अॅडव्हान्स पेमेंट सप्टेंबर 2014 च्या आहेत.

राज्यात 2018 पर्यंतच्या 66 हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर, कॅगचा संशय

फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई एअरपोर्टचे टेंडर 2015 नंतरचे आहेत. ज्यात खडक भरणीचे 20 कोटींच्या देयकाबाबत आक्षेप नोंदवले आहेत. यात प्रोसेजरीयल लॅप्सेस आहेत, ते नक्कीच सुधारायला हवेत. मात्र सिडकोच्या बोर्डात मंत्री किंवा मुख्यमंत्री नसतात. सिडको पूर्णतः स्वायत्त संस्था आहे. टेंडर प्रक्रिया बोर्डाच्या पातळीवर होते. कॅगने नोंदवलेल्या आक्षेपांवर पब्लिक अकाउंट्स कमिटी (PAC) संबंधित अधिकाऱ्यांची सुनावणी घेऊन कारवाई करतील, असं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Mumbai BEST Bus Accident: भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....
भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Embed widget