एक्स्प्लोर

फडणवीस सरकारच्या काळात सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा, कॅगचा ठपका, शिवसेनेकडून न्यायालयीन चौकशीची मागणी

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालानं ठेवला आहे. याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चादेखील झाली आहे. अडीच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं कॅगच्या अहवालात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई : सिडको घोटाळ्याप्रकरणी कॅगनं फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. हा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या अहवालवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या प्रकरणाची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी केली आहे. तर कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं भाजपच्या वतीनं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालानं ठेवला आहे. कॅगच्या अहवालाची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चाही झाली असल्याची माहिती आहे. सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे, असं सूत्रांकडून कळालं आहे.

कॅग अहवालाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीतील मतभेद सभागृहात उघड, नवाब मलिकांनी जयंत पाटलांना टोकले

दरम्यान याबद्दल एबीपी माझाशी बोलताना भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देवेंद्रजी आणि मी (सुधीर मुनगंटीवार) स्वतः सांगत आहोत की जर यामध्ये तथ्य असेल आणि कुणी घोटाळा केला असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. यामध्ये तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती केली पाहिजे. मात्र सुतावरून स्वर्ग गाठायचा असं होता काम नये. संशय ठेऊ नका, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

राज्यात 2018 पर्यंतच्या 66 हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर, कॅगचा संशय

तर शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रभू म्हणाले की, CAG ने ज्या पद्धतीने फडणवीस सरकारवर सिडकोमध्ये भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवला आहे. असं असल्यास ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने या अहवालात भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जावी. सरकारने सत्य समोर आणावं, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल, असं प्रभू यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमिनीच्या व्यवहारात मोठा घोटाळा केल्याचा आरोप फडणवीस सत्तेत असताना काँग्रेसनं केला होता.  सिडकोच्या जमिनीची किंमत 1, 767 कोटी रुपये असताना ती अवघ्या तीन कोटी रुपयांना बांधकाम व्यावसायिक मनीष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकली असल्याचा दावा देखील  काँग्रेसनं केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Embed widget