...म्हणून राज्यपाल चिडले आणि काँग्रेसच्या के सी पाडवींना पुन्हा शपथ घ्यायला लावली
काँग्रेसचे अक्कलकुवाचे आमदार के सी पाडवी यांच्यामुळे चर्चेत राहिल. के सी पाडवी यांनी पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली.
![...म्हणून राज्यपाल चिडले आणि काँग्रेसच्या के सी पाडवींना पुन्हा शपथ घ्यायला लावली Cabinet expansion, governor forced to KC Padavi of Congress to take oath again ...म्हणून राज्यपाल चिडले आणि काँग्रेसच्या के सी पाडवींना पुन्हा शपथ घ्यायला लावली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/30091738/kc-PADVI.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काँग्रेसचे आमदार के सी पाडवी यांच्यावर चिडल्याचं दिसून आलं. शपथविधीनंतर के सी पाडवी यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केल्याने राज्यापालांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पाडवी यांना राज्यपालांनी पुन्हा शपथ घेण्याच्या सूचना केल्या, त्यानुसार पाडवी यांनी पुन्हा शपथ घेतली.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला शपथविधी सोहळा चर्चेत होता. तसा पहिला मंत्रिमंडळ विस्तारही काँग्रेसचे अक्कलकुवाचे आमदार के सी पाडवी यांच्यामुळे चर्चेत राहिल. के सी पाडवी यांनी पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक केली आणि त्यांना पुन्हा शपथ घेण्याच्या सूचना दिल्या. तुमच्या समोर शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित आहेत. मी चुकीचा आहे असं त्यांना वाटलं तर मी त्यांचं म्हणणं मान्य करेल. जेवढं लिहिलंय तेवढंच वाचा असं राज्यापालांनी के सी पाडवी यांना सांगितलं. त्यानंतर के सी पाडवी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली.
ठाकरे सरकारच्या पहिल्या शपथविधी सोहळ्यानंतरही राज्यपालांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. मंत्र्यांनी अनेकांना स्मरुन शपथ घेतल्याने विरोधकांनीही ठाकरे सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीवर टीका केली होती. उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी घेतलेली शपथ ही बेकायदेशीर आहे. मंत्र्यांचा शपथविधी प्रोटोकॉलनुसार झाला पाहिजे, असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता.
शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (मुंबई) अनिल परब (मुंबई) उदय सामंत (रत्नागिरी) गुलाबराव पाटील (जळगाव) दादा भुसे (मालेगाव, नाशिक) संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ) संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद) शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर) अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद) राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर) शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा) बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती) काँग्रेसचे मंत्री के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार) अशोक चव्हाण (नांदेड) अमित देशमुख (लातूर) यशोमती ठाकूर (अमरावती) विजय वड्डेटीवार (चंद्रपूर) सुनील केदार (नागपूर) अस्लम शेख (मुंबई) वर्षा गायकवाड (मुंबई) सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर) विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली) राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे) दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे) धनंजय मुंडे (परळी, बीड) अनिल देशमुख (नागपूर) डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखे़ड राजा, बुलडाणा) हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर) जितेंद्र आव्हाड (ठाणे) नवाब मलिक (मुंबई) बाळासाहेब पाटील (कराड, सातारा) राजेश टोपे (अंबड, जालना) प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर) दत्ता भरणे (राज्यमंत्री) (इंदापूर) अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड) संजय बनसोडे (राज्यमंत्री) (उदगीर, लातूर)महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)