एक्स्प्लोर

स्मार्ट सिटी करण्यासाठी अगोदर रस्ते नीट करा : हायकोर्ट

कोणत्याही शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तिथे चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण करणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं मत यावेळी हायकोर्टाने नोंदवलं.

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मुंबई हायकोर्टाने दाखल करून घेतलेली सुमोटो जनहित याचिका गुरूवारी निकाली काढली. कोणत्याही शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तिथे चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण करणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं मत यावेळी हायकोर्टाने नोंदवलं. उत्तम दर्जाचे रस्ते वापरणं हा नागरिकांचा मुलभूत अधिकार असल्याचंही हायकोर्टाने स्पष्ट केलं. संबंधित प्रशासकीय यंत्रणेने लोकांच्या तक्रारींची वेळीच गंभीर दखल घेतली तर लोकांना याबाबत हायकोर्टात येण्याची वेळच येणार नाही, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं. रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात तक्रार निवारणासाठी स्वतंत्र एकछत्री यंत्रणा 15 जूनपर्यंत कार्यरत करण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. त्याचबरोबर रस्ते निर्मिती आणि त्यांच्या देखभालीचं कंत्राट देताना रस्ते उत्तम दर्जाचे बनतील याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी मान्सून दरम्यान मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवरुन हायकोर्टाला लिहिलेल्या पत्राचं याचिकेत रूपांतर केलं. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. खड्डे हीच केवळ खराब रस्त्यांची व्याख्या नसून असमतोल रस्ते, फुटपाथ, दुभाजक, रस्त्यांवर दिव्यांचा अभाव, उघडी आणि असमतोल मॅनहोल या सर्व गोष्टी खराब रस्त्यांच्या व्याख्येत येतात. त्यामुळे या सर्व बाबींचा मुंबई महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, बीपीटी, सिडको या सर्वांनी गांभीर्याने विचार करावा, असे निर्देश हायकोर्टाने दिले. प्रशासनाच्या चुकांमुळे बऱ्याचदा पादचारी, दुचाकी चालक रस्ते अपघतात जखमी होतात, प्रसंगी त्यांचा जीवही जातो. अशा वेळी संबंधित यंत्रणेला यासाठी जबाबदार धरुन नुकसान भरपाई मागितली जाते. त्यामुळे योग्य सूचना फलक जागोजागी लावणं ही देखील प्रशासनाचीच जबाबदारी असल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलं. या सर्व निर्देशांची 21 जुलैपर्यंत पूर्तता करण्याचे निर्देश देत हायकोर्टाने 24 जुलैला यावर पुन्हा सुनावणी ठेवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Embed widget