एक्स्प्लोर
पाण्यावरून झालेल्या वादातून दीराकडून वहिनीची हत्या
हिनी ऐकत नसल्याचे पाहून योगेश संतापला. त्याने रागाच्या भरात अचानक घरातील कोयता आणून तिच्या डोक्यावर वार केले.
मुंबई : कुठला वाद कधी आणि किती टोकाला जाईल आणि त्या वादाचा निकष काय असेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना खार येथे घडली. पाण्यावरून झालेल्या वादातून दीराने वहिनीची हत्या केल्याची घटना खार येथे घडली. नमिता पोखरे असे मृत महिलेचे नाव आहे. खार पोलिसांनी या प्रकरणी योगेश पोखरे (35) याला अटक केली आहे.
खार पश्चिमेकडील अमिना रोशन हाऊस खोली क्रमांक दोनमध्ये निलेश पोखरे आणि योगेश पोखरे हे भाऊ कुटुंबीयांसोबत एकाच घरात राहतात. एकाच घरात राहत असले तरी दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होते.
घरात पाण्याचा एकच नळ असून शुक्रवारी संध्याकाळी पाणी आले त्यावेळी नमिता आणि योगेश यांच्यात पाणी भरण्यावरून वाद झाला. वहिनी ऐकत नसल्याचे पाहून योगेश संतापला. त्याने रागाच्या भरात अचानक घरातील कोयता आणून तिच्या डोक्यावर वार केले.
त्यात नमिता रक्तबंबाळ झाल्या. या घटनेनंतर योगेश तिथून पळाला आणि खार पोलीस स्टेशन येथे जाऊन शरणागती पत्करली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला नीलेशने तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, नमिता यांना दाखल करून घेण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement