एक्स्प्लोर

कुलभूषण जाधव यांना परत आणा, लाँड्री बॉयची सरकारला आर्त साद

मुंबई : माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकने सुनावलेल्या फाशीविरोधात देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. मुंबईतल्या त्यांच्या घराबाहेर शेकडो लोकांनी मानवी साखळी बनवून सरकारकडे त्यांना परत आणण्याची मागणी केली. या साखळीत विजय कनोजिया हा तरुणही सहभागी झाला होता. एकेकाळी लाँड्री बॉयचं काम करणाऱ्या विजयला कुलभूषण यांनी मुलाप्रमाणे सांभाळलं. त्याच्या शिक्षणासाठी मदत केली आणि आता हा लाँड्री बॉय फिजिक्स ग्रॅज्युएट होऊन एनडीएच्या प्रवेशाची तयारी करत आहे. कुलभूषण यांच्यावरील आरोप खोटे असून सरकारने त्यांना सोडवून आणावं, अशी मागणी विजयने केली आहे. कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोण आहेत कुलभूषण जाधव? कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती. कुलभूषण यांना परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न पाकिस्तानच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढच्या आठवड्यात अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारतात येणार आहेत. यावेळी कुलभूषण यांच्या मुद्द्यावरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणणारच. भारतीय सरकार हा मुद्दा उच्च स्तरावर मांडणार. या मुद्द्याबाबत उच्च स्तरावर बातचीत होऊ शकते. पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारत दौऱ्यावर आहे. यावेळी एनएसए स्तरावर या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार, “कुलभूषण जाधव यांचा मुद्दा भारत सरकार उच्च स्तरावर मांडणार आहे. कुलभूषण जाधव यांनी कधीही ‘रॉ’ किंवा कोणत्याही भारतीय गुप्तचर यंत्रणेसाठी काम केलं नाही. पाकिस्तानचे दावे आधारहीन आहेत. मीडियामधील वृत्त तथ्यहीन आहेत. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान नाही तर इराणमधून ताब्यात घेण्यात आलं. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी पाकिस्तान खोटं बोलत आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना कदाचित मारलं असावं, माजी गृहसचिव आर के सिंह यांचं हे विधान चुकीचं आहे. भारत सरकार कुलभूषण जाधव यांना परत आणणारच.” संबंधित बातम्या :

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा

महत्त्वाच्या बातम्या

डीजे वाजणारच! तो बंद करुन दाखवाच, गुणरत्न सदावर्तेंचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा
डीजे वाजणारच! तो बंद करुन दाखवाच, गुणरत्न सदावर्तेंचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
राज ठाकरेंनी भावाकडं ज्ञान पाजळावं, शिवसेना भवनमधील फोटो प्रोटोकॉल प्रमाणे आहे का? 15 दिवसात तो फोटो काढा अन्यथा... सदावर्तेंचा ठाकरेंना इशारा
राज ठाकरेंनी भावाकडं ज्ञान पाजळावं, शिवसेना भवनमधील फोटो प्रोटोकॉल प्रमाणे आहे का? 15 दिवसात तो फोटो काढा अन्यथा... सदावर्तेंचा ठाकरेंना इशारा
औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द
औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
Iran War Live Update: गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली,एका व्यक्तीचा मृत्यू, 3 जण गंभीर, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, एका व्यक्तीचा मृत्यू, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
Embed widget