एक्स्प्लोर
अबू सालेमचा लग्न करण्यासाठी पॅरोलचा अर्ज हायकोर्टाने फेटाळला
लग्न करण्याकरता सालेमने मुंबई उच्च न्यायालयात 45 दिवसांच्या पॅरोलसाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला. एवढ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला सोडणं शक्य नसल्याचं कोर्टाने सांगितलं.
मुंबई : 1993 सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमला कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला. लग्न करण्याकरता सालेमने मुंबई उच्च न्यायालयात 45 दिवसांच्या पॅरोलसाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला.
दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला बाहेर सोडणं शक्य नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-तहिलरमानी आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
सालेमला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रितसर लग्न करायचं असल्याचं त्याने या अर्जात कोर्टाला सांगितलं होतं. तसेच गंभीर गुन्ह्यात फर्लो मिळत नसल्याने आपल्याला पॅरोलवर सोडण्याची विनंती त्याने कोर्टाला केली होती.
साल 2014 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचे धावत्या लग्न ट्रेनमध्ये झालेले आहे अशी बातमी फोटोसह एका वृत्तपत्रात आली होती. हे फोटो आल्यानंतर स्वत: अबू सालेमनही मुंब्र्यातील कौसर नावाच्या या मुलीसोबत आपले संबंध असल्याचे न्यायालयात कबूल केले. एवढचं नाही तर, आपल्याला त्या मुलीशी आता रितसर लग्न करायचे आहे त्याकरता परवानगीदेखील अबू सालेमने न्यायालयाकडे मागितली होती.
लिस्बन, पोर्तुगाल येथून अबू सालेमचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात अबू सालेमवर गंभीर स्वरुपाचे खटले सुरू आहेत. त्यामुळे त्याला बऱ्याचदा दुसऱ्या राज्यांतील कोर्टात ट्रेनने नेलं-आणलं जातं.
1993 च्या साखळी बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याच्या आरोपात 'टाडा' (Terrorist and Disruptive Activities (Prevention) Act) न्यायालयाने अबू सलेमला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याने तो सध्या तुरुंगात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement