एक्स्प्लोर
Advertisement
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार
महत्त्वपूर्ण खटल्यात बोललेली एखादी गोष्टी विसरू नये यासाठी आपण स्वत:च्या वापराकरता व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याची न्यायमूर्तींनी भर कोर्टात कबूली दिली. या गोष्टीला सकारात्मक भूमिकेनं बघत नव्या पिढीतील न्यायाधीशांनी सुरू केलेल्या या नव्या हायटेक पद्धतीचं काही वकिलांनी स्वागतच केलंय.
मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश गुरूवारी न्यायमूर्ती डी. एस. नायडू यांनी जारी केलेत. अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतूदीनुसार खटल्याची व्हिडीओ रेकॉर्डिंग करणं आवश्यक असल्याची बाब तक्रारदाराचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली. त्यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती डी. एस. नायडू यांनी मंगळवारी होणारी पुढील सुनावणी रेकॉर्ड करण्याची व्यवस्था करण्याचे हायकोर्ट प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
इतकंच नव्हे तर नव्यानं हायकोर्टात नियुक्त झालेले न्यायमूर्ती डी. एस. नायडूंनी आपण स्वत:देखील आयपॅडवर सुनावणीचं व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याचं उपस्थितांना दाखवलं. महत्त्वपूर्ण खटल्यात बोललेली एखादी गोष्टी विसरू नये यासाठी आपण स्वत:च्या वापराकरता व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याची न्यायमूर्तींनी भर कोर्टात कबूली दिली. या गोष्टीला सकारात्मक भूमिकेनं बघत नव्या पिढीतील न्यायाधीशांनी सुरू केलेल्या या नव्या हायटेक पद्धतीचं काही वकिलांनी स्वागतच केलंय.
दरम्यान याप्रकरणी आता आरोपपत्र दाखल झालं असल्यानं तांत्रिकदृष्ट्या या जामीन अर्जावर खटला सुरू असलेल्या मुंबई सत्र न्यायालयातच सुनावणी होणं अपेक्षित असल्याचं विशेष सरकारी वकिल राजा ठाकरे यांनी गुरूवारी कोर्टाला सांगितलं. मात्र या याचिकेत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं असल्यानं त्याची सुनावणी हायकोर्टात होऊ शकते असं स्पष्ट करत हायकोर्टानं पुढील आठवड्यात यावर सुनावणी घेण्याचं स्पष्ट केलंय.
डॉ. पायल तडवीने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी 23 मे रोजी गुन्हा नोंदवून नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्टरांना अटक केली आहे. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्टरांवर रॅगिंग आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
डॉ. पायल तडवींनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी :
"आज माझी आणि स्नेहलची जी अवस्था झालीय, त्याला सर्वस्वी हेमा अहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल जबाबदार आहेत. आज त्यांनी जे केलंय किंवा याआधी एस.एच.ओ., विभागप्रमुख आणि प्राचार्यांच्या विभागप्रमुखांपुढे आमची चुकीची प्रतिमा तयार केली आहे. मी ब-याचदा पुढे येऊन मॅडमशी याबाबत बोलले, तक्रारही केली. मात्र त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे आता मला यातून कोणताच मार्ग दिसत नाही. दिसतोय तो फक्त शेवट."
संबंधित बातम्या
डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी सुमारे 2 हजार पानी आरोपपत्र दाखल
डॉ. पायल तडवी प्रकरण : सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला आरोपींकडून हायकोर्टात
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींचा जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर अॅन्टी रॅगिंग कायदा कडक करण्यासाठी सरकारच्या हालचाली
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या जामिनाला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचा विरोध
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडी 21 जूनपर्यंत वाढवली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
नाशिक
Advertisement