एक्स्प्लोर

सरकारी नोकरीत अंधांना आरक्षण, भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश

कमी दृष्टी तसेच अंधांना सरकारी नोकरीत एकत्रित आरक्षण देण्यात आल्यामुळे आपल्याला नोकरी मिळाली नाही, असा आरोप करत मनकले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : कमी दृष्टी आणि अंध व्यक्तींना सरकारी नोकरीत एकत्र आरक्षण न देता अंध व्यक्तींना सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने केंद्र सरकारला (यूपीएससी) नोटीस बजावली असून आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा दिलेले जयंत मनकले हे अंध असून 2017 मध्ये त्यांचा प्रशासकीय परीक्षेत 923 वा क्रमांक आला. त्यानुसार त्यांनी प्रशासकीय सेवेत नोकरी मिळावी म्हणून अर्ज केला. परंतु त्यांना नोकरी काही मिळाली नाही. या संदर्भात चौकशी केली असता सरकारी नोकरीतील 920 पदांपैकी केवळ नऊ जागा या अंध तसेच कमी दृष्टी असणाऱ्या व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. कमी दृष्टी तसेच अंधांना सरकारी नोकरीत एकत्रित आरक्षण देण्यात आल्यामुळे आपल्याला नोकरी मिळाली नाही, असा आरोप करत मनकले यांनी  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी नुकतीच सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने सरकारला नोटीस बजावत या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत तीन डिसेंबरपर्यंत ही सुनावणी तहकूब केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचारRajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेटAmbadas Danve : MIM विघातक शक्ती, कुठलीही चर्चा नाही : अंबादास दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Embed widget