एक्स्प्लोर
अमिताभ बच्चन यांच्या 'प्रतीक्षा' बंगल्यावर लगेचच हातोडा नाही, महापालिकेकडून एक महिन्याचा कालावधी
जुहू येथील ईस्ट-वेस्ट मार्ग म्हणजेच संत ज्ञानेश्वर मार्ग रुंदीकरणासाठी प्रतिक्षा बंगल्याबाहेरील 8 ते 10 फूट जागा पालिकेकडून ताब्यात घेतली जातेय.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगल्याबाहेरील संरक्षक भिंतीवर मुंबई महापालिका लगेचच ताब्यात घेणार नाही आहे. संरक्षक भिंत स्वत:हून काढून घेण्यासाठी बच्चन यांना एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे.
अमिताभ बच्चन यांनी महिन्याभरात स्वत:हून जागा न दिल्यास मुंबई महापालिका बंगल्याबाहेरील संरक्षक भिंतीवर कारवाई करत जागा ताब्यात घेणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जुहू येथील ईस्ट-वेस्ट मार्ग म्हणजेच संत ज्ञानेश्वर मार्ग रुंदीकरणासाठी प्रतिक्षा बंगल्याबाहेरील 8 ते 10 फूट जागा पालिकेकडून ताब्यात घेतली जातेय.
अमिताभ बच्चन यांच्या शेजारील के.व्ही.सत्यमुर्ती यांच्या बंगल्याची संरक्षक भिंत मुंबई महापालिकेने गुरुवारी तोडली. यावरून वातावरण चांगलेच तापले असून सत्यमूर्ती यांनी महापालिका आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत. बीएमसी बीग बीच्या घरांवर हातोडा मारणार का? असा सवाल करत बीएमसी दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप सत्यमूर्ती यांनी केला आहे. बीग बीची भिंत तोडायला बीएमसी घाबरत आहे. आम्हाला दोघांना वेगळा न्याय का? बीग बीने सेटिंग केली असेल, असा आरोपही सत्यमूर्ती यांनी केला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर होणाऱ्या कारवाईच्या बदल्यात अमिताभ बच्चन यांना मुंबई महापालिका टीडीआर (अतिरीक्त बांधकाम/ जागेची परवानगी) देणार आहे. मार्च २०१८ मध्ये अमिताभ बच्चन यांना नोटीस देण्यात आल्याने पालिका पुन्हा नोटीस देणार नाही आहे.
VIDEO | अमिताभ बच्चन यांच्या 'प्रतीक्षा' बंगल्याची आणि सत्यमूर्ती रेसिडेन्सीची जागा महापालिका ताब्यात घेणार | एबीपी माझा
बंगल्यांच्या रस्त्यालगतची जागा का ताब्यात घेतली जातेय?
जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या बंगल्यांची जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. जुहूतील या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिकेने 45 फुटांच्या संत ज्ञानेश्वर मार्गाचे 60 फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सी आणि अमिताभ बच्चन यांच्या 'प्रतीक्षा' बंगल्याच्या आवारातील काही जागेची आवश्यकता असल्याचे महापालिकेचं म्हणणं आहे.
VIDEO | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची 'दिवार' तुटणार! | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
महानायकाचा 'आशियाना'
मुंबईत बिग बींचे पाच बंगले आहेत
प्रतीक्षा, जलसा, जनक, आशियानासह एक बंगला
ज्यांची किंमत अंदाजे 300 कोटींच्या घरात आहे
जलसा बंगल्यात अमिताभ यांचं कुटुंब राहतं
जनक बंगल्यात अमिताभ यांचं कार्यालय आहे
नात आराध्यासाठी आशियाना बंगल्याची खरेदी केली आहे
संघर्षाच्या काळात अभिनेते आणि दिग्दर्शक मेहमूद यांच्या घरी अमिताभ काही काळ राहिले होते. आज मुंबईत त्यांचे स्वतःच्या मालकीचे पाच आलिशान बंगले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement