एक्स्प्लोर

BMC : मुंबईतील प्रकल्पावरून ठाकरे गट आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये श्रेयवाद, एसटीपी प्रकल्पसंदर्भात आदित्य ठाकरे यांचं आयुक्तांना पत्र

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व असणार आहे. कारण याच दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील अनेक महत्त्वाच्या विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आहेत.  पंतप्रधान विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण यामध्ये करणार आहेत. आता या दौऱ्याआधीच प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या काळात सुरू केलेल्या आणि ज्या प्रकल्पांना गती दिली ते प्रकल्प का रखडले ? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांनी बीएमसी आयुक्तांना पत्र लिहित सवाल विचारला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यवर आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व असणार आहे. कारण याच दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील अनेक महत्त्वाच्या विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत. यामध्येच  सांडपाण्यावरील जलशुद्धीकरण प्रकल्प (STP) याचे सुद्धा उद्घाटन केलं जाणार आहे.  आणि यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून या प्रकल्पाला गती मिळाली असताना हा प्रकल्प सहा महिने का रखडला ? असा प्रश्न विचारत थेट या पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे

मुंबई महापालिकेच्या वतीने प्रस्तावित सांडपाण्यावरील जलशुद्धीकरण प्रकल्प हा ऑक्टोबर 2022 मध्ये आणि समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करण्याचा प्रकल्प 2023 च्या मध्यापर्यंत भूमिपूजनासाठी तयार होणार होते. मात्र यातील सांडपाण्यावरील जलशुद्धीकरणावरील प्रकल्पाचा भूमिपूजन मविआच्या काळात न होता शिंदे फडणवीस सरकारच्या काळात होत आहे.  त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यामुळे बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने केला जातोय

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात नेमक्या कोणत्या मुंबई महापालिकांच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार? 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारीला मुंबईत पालिकेच्या कामांचा शुभारंभ होणार  आहे. बीकेसी येथे  हा कार्यक्रम होणार आहे.
  • मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत. 
  • पालिकेची तीन रुग्णालये,  मलनिस्सारण प्लांट, सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते, पंतप्रधान स्वनिधी निधी योजना अशा विविध कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार 
  • आपली चिकित्सा योजने अंतर्गत भांडुप सुपर स्पेशालिटी, ओशिवरा प्रसुतीगृह, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय यांच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे. 
  • तसेच 7 मलनिस्सारण प्लांट आणि मुंबईत होणारे 400 किलोमीटरचे सिमेंट कॉंक्रिटचे  रस्ते याचे भूमिपूजन होणार
  •  1 हजार 750 कोटी रुपये खर्चून मुंबईचे सौंदर्यीकरण अशा विविध पाचशेहून अधिक कामांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
  • त्यामुळे बीएमसी निवडणुकांच्या आधी मुंबईवर लक्ष केंद्रित करत या विकास कामांच्या उद्घाटन करण्याचे नियोजन करून याचं पूर्ण शिंदे फडणवीस सरकार घेणार असल्याचे चित्र आहे

महाविकास आघाडीच्या काळात रखडलेले प्रस्तावित प्रकल्प आणि त्यात मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने खास मुंबईकरांसाठी सुरू केलेल्या विकास कामांचे प्रकल्प... या सगळ्याच प्रकल्पाचा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात लोकार्पण उद्घाटन होत आहे.  त्यामुळे अर्थातच आधीच्या सरकारमधील प्रस्तावित प्रकल्पावरून श्रेयवाद होणार आणि त्याचा पहिला अध्याय या प्रकल्पावरून पाहायला मिळतोय. आता या श्रेयवादाच्या लढाईचा कोणाला कितपत फायदा होतो ? हे बीएमसी निवडणुकातच कळणार आहे. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget