एक्स्प्लोर
रस्त्यावरच्या ज्यूस-गोळ्यातलं 74 टक्के पाणी दुषित : BMC
![रस्त्यावरच्या ज्यूस-गोळ्यातलं 74 टक्के पाणी दुषित : BMC Bmc Survey Finds Ice In Roadside Juice Is From Contaminated Water Live Update रस्त्यावरच्या ज्यूस-गोळ्यातलं 74 टक्के पाणी दुषित : BMC](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/09085205/Juice-Ice-Gola.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : उन्हाळा असल्यामुळे शरीराला थंडावा मिळवण्यासाठी तुमच्यापैकी अनेक जण रस्त्यावरील ज्यूस किंवा बर्फाच्या गोळ्याचा पर्याय निवडत असतील. मात्र या सरबतांमधला बर्फ तुमच्या शरीरासाठी अपायकारक ठरु शकतो. मुंबईत रस्त्यावरील बर्फाचे 74 टक्के नमुने दुषित आढळले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात गॅस्ट्रोच्या साथीनं थैमान घातलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं पाहणी केली. मुंबईत रस्त्यारस्त्यांवर अनेक पदार्थात टाकला जाणारा बर्फ आणि बर्फाचं पाणी यांचे 74 टक्के नमुने दुषित आढळले आहेत. यामध्ये ज्यूस, बर्फाचे गोळे, पाणीपुरी यांचा समावेश आहे.
मुंबईत गॅस्ट्रोची मोठी साथ, दुषित पाण्याने उन्हाळ्यातच कहर
फेरीवाल्यांकडच्या पाण्याच्या नमुन्यात 10 टक्के पाणी दुषित असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे रस्त्यांवरुन बर्फ आणि बर्फाच्या पाण्याचे पदार्थ खाऊ नयेत, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या गॅस्ट्रो म्हणजेच अतिसाराच्या आजाराने भर उन्हाळ्यात डोकं वर काढलं आहे. मुंबईत जानेवारी ते एप्रिल दरम्यान गॅस्ट्रोचे 2 हजार 280 रुग्ण आढळले आहेत. एप्रिल महिन्यातच गॅस्ट्रोचे सर्वाधिक म्हणजे 916 रुग्ण आढळले आहेत. रस्त्यांवरील खाद्यपदार्थ आणि सरबतासाठी वापरल्या जाणाऱ्या दूषित पाणी आणि बर्फामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढल्याचा अंदाज आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)