एक्स्प्लोर

BMC Workers Officers Protest : BMC अधिकाऱ्यांवर हल्ले, ईडी-एसआयटीकडून चौकशीचा ससेमिरा; अभियंते, अधिकारी आक्रमक

BMC Workers Officers Protest : कथित भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपानंतर सुरू असलेली ईडी, एसआयटी चौकशी आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात मुंबई महापालिकेचे अधिकारी, अभियंते आक्रमक झाले आहेत.

BMC Workers Officers Protest : मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले आणि ईडी (ED), एसआयटीकडून (SIT) सुरू असलेल्या चौकशीच्या ससेमिऱ्याविरोधात मुंबई महापालिकेचे (BMC) अधिकारी, अभियंते अधिक आक्रमक झाले आहेत. या जाचाविरोधात येत्या 23 ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अभियंते मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनांकडून करण्यात आले. 

मागील काही महिन्यांपासून मुंबई महापालिका अधिकारी, अभियंता यांच्यावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध कारणांनी हल्ले सुरू आहेत. त्याशिवाय, ईडी, विशेष चौकशी पथकाकडून (SIT) चौकशी सुरू आहे. मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे.  राजकीय पक्ष, संघटनांकडून होणारे हल्ले आणि ईडी, एसआयटी कडून सुरू असलेल्या चौकशीच्या ससेमिऱ्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे. मुंबई महापालिका कर्मचारी, कामगार, अभियंता, अधिकारी अशा विविध संघटनांकडून 23 ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे. 

सरकारच्या 332 व 352 कलम रद्द करण्याच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका कर्मचारी कामगार संघटना समन्वय समितीच्यावतीने देण्यात आली.  या समन्वय समितीमध्ये मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी संघटना आहे. 

कोरोना काळात स्वतः चा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांकडून आणि यंत्रणा कडून त्रास दिला जात असल्याचा बीएमसी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा आरोप आहे. यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाई बीएमसी अधिकारी, कर्मचारी ,अभियंता यांचे खच्चीकरण करत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. साथरोग अधिनियम कायद्यानुसार कंत्राटे आणि कामे काढली असताना आणि या संदर्भात चौकशी केली जात नसल्याचं परिपत्रक राज्य सरकारने काढले असताना चौकशी करून त्रास दिला जात असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. 

मुंबई महापालिकेचे एक लाखापेक्षा अधिक कर्मचारी अधिकारी या सगळ्याविरोधात एकत्र आल्यास आणि पुरवल्या जाणाऱ्या सेवा ठप्प झाल्यास राज्य सरकार जबाबदारी राहील, असा इशाराही संघटनांनी दिला आहे. 

एच पूर्व विभागातील सहाय्यक अभियंता अजय पाटील भजन पूर्व भागातील कार्यकारी अभियंता अनिल जाधव यांना राजकीय पक्षांकडून मारहाण करण्यात आली होती. 332 व 353 कलम रद्द केल्यास भविष्यात कोणत्याही पक्षाचा पुढारी अथवा गल्लीतील तथाकथित नेता सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करू शकतो अथवा त्यांच्या कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून कर्तव्य पार पाडण्यास दबाव आणून विरोध करू शकतो, अशी भीतीदेखील संघटनांनी व्यक्त केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Embed widget