एक्स्प्लोर

मास्क न घातल्याने मुंबईत पहिल्या गुन्ह्याची नोंद, काय शिक्षा मिळणार?

मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांची वाढती संख्या पाहून बीएमसी प्रशासन वैतागलं आहे. त्यातच मास्क न घातल्याबद्दल मुंबईत पहिला गुन्हा नोंद झाला आहे.जनजागृती करुनही नियमांचं पालन न केल्याने, मास्क न वापरल्याने मुंबई महापालिकेने दंडाची रक्कम वाढवण्याचाही विचार केला आहे.

मुंबई : मुंबईत मास्क न घातल्याबद्दल पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. विनामास्क फिरणाऱ्या एका बेजबाबदार नागरिकावर मुंबई महापालिकेने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिका आता विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये राहुल मधुकर वानखेडे नावाच्या 28 वर्षीय तरुणाविरोधात बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा नोंदवला आहे.

एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आरोपी मास्कशिवाय फिरत होता. त्यावेळी बीएमसीच्या टीमने आरोपीला रोखून मास्क न घातल्याने विचारणा केली. परंतु त्याने कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची आणि उद्धट उत्तरं दिली. यानंतर बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कलम 186 आणि कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

दंडाची रक्कम वाढवण्याचा बीएमसीचा इशारा मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजारांच्या पार पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 9 हजार 500 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचं हॉटस्पॉट असलेल्या मुंबईसह राज्यभरात मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. बीएमसीने मास्कबाबत "नो मास्क नो एंट्री" हे अभियान राबवलं आहे. मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर बीएमसीने 200 रुपयांचा दंडाची तरतूद केली आहे. परंतु मास्क न वापरण्याचं प्रमाण जास्त दिसू लागलं तर दंडाची रक्कम वाढवण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

आतापर्यंत 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई "मुंबई महापालिकेने आतापर्यंत मास्क न घालणाऱ्या 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करुन एक कोटी रुपयांपेक्षा जास्त दंडाची रक्कम वसूल केली आहे," अशी माहिती बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली. "सध्या मास्क न घालणाऱ्यांसाठी 200 रुपये दंड आकारला जातो. मात्र, मुंबईकर जर असेच बेशिस्त राहिले तर दंडाची रक्कम वाढवण्याचा विचार होऊ शकतो," असंही सुरेश ककाणी म्हणाले.

मास्क न वापरल्यास तुरुगंवासाची शक्यता साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1897 च्या कलम 3, अंतर्गत दिलेले आदेश न पाळल्यास दंडाची कारवाई करण्याची तरदूत आहे. यामध्ये कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली जाते. या गुन्ह्यात ठरविक काळासाठी तुरुंगावास जो एक महिन्याचा असू शकतो किंवा 200 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. काही प्रकरणात दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mohan Bhagwat : संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget