एक्स्प्लोर

BMC : लसीच्या नावाखाली केवळ 'सलाईन वॉटर' टोचलं!, मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

बोगस लसीकरणासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली असून त्यानुसार खाजगी पातळीवर अथवा सोसायटीमध्ये लसीकरण मोहीम राबविताना पालिका प्रशासनाला त्याची माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

मुंबई : शहरात आजपर्यंत एकूण 2773 बोगस लसीकरणाची प्रकरणं उघडकीस आली असून त्यातील 1636 जणांची बीएमसीने तपासणी केलेली आहे. या लोकांच्या शरीरावर कुठलाही विपरीत परिणाम झालेला नाही. या लोकांना लसीच्या नावाखाली केवळ 'सलाईन वॉटर' टोचल्याची माहिती शुक्रवारी बीएमसीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या या सगळ्यांचं लवकरात लवकर पुन्हा नियमित लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी कोविन पोर्टलवर त्यांची झालेली नोंदणी रद्द करून पुन्हा नव्यानं यांची नोंदण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे, अशी माहितीही यावेळी पालिकेनं हायकोर्टाला दिली. येणाऱ्या काळात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पालिका पूर्ण खबरदारी घेत असल्याचेही त्यांनी हायकोर्टाला सांगितलं. 

बोगस लसीकरणासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली असून त्यानुसार खाजगी पातळीवर अथवा सोसायटीमध्ये लसीकरण मोहीम राबविताना पालिका प्रशासनाला त्याची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. पालिकेकडे अशा खासगी लसीकरणाची माहिती येताच त्याबाबत चौकशी करुन सदर लसीकरण अधिकृत आहे की नाही ते पालिकेकडून सांगण्यात येईल, असेही पालिकेच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं.

मुंबईत लसीकरणासाठी स्लॉट उपलब्ध होत नसल्याबद्दल सिद्धार्थ चंद्रशेखर यांनी अँड. अनिता कॅस्टिलिनो यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत घडलेल्या बोगस लसीकरणाकडेही हायकोर्टाचं लक्ष वेधण्यात आलं आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी पार पडली.

दुसरीकडे, कांदिवली पोलीस ठाण्यात यासंदर्भात जो पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबत चौकशी आणि तपास आता अंतिम टप्प्यात आहे. तसेच लवकरच याबाबत आरोपपत्र दाखल करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं यावेळी न्यायालयात देण्यात आली. त्याची दखल घेत चौकशीचा प्रगती अहवाल न्यायालयात दोन आठवड्यात सादर करण्याचे निर्देश देत हायकोर्टानं ही सुनावणी तहकूब केली.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 7 PMJob Majha | Agricultural Scientists Recruitment Board येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? एकूण जागा किती?ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 02 March 2025Thane Shinde Vs Thackeray Supporter | संजय राऊतांचा ठाणे दौरा, शिंदेंचे कार्यकर्ते आक्रम, दोन्ही गटाच्या नेत्यांची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Embed widget