एक्स्प्लोर
मुंबईत वरळी सीफेसवरील 'हॉटेल तवा'वर पालिकेचा हातोडा
वरळी सीफेसवर असलेलं 'हॉटेल तवा' अर्थातच 'कॅफे सी-फेस'च्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने तब्बल 11 वर्षांनी हातोडा चालवला.
मुंबई : मुंबईत वरळीमध्ये असलेलं 'हॉटेल तवा' अर्थातच 'कॅफे सी-फेस'वर अखेर महापालिकेने हातोडा चालवला. 2007 पासून राजकीय आणि इतर क्षेत्रातील वरदहस्तामुळे हे अनधिकृत हॉटेल सुरु होतं.
तब्बल 11 वर्षांनी या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कारवाई केली. न्यायालयाने तोडकामाला स्थगिती देण्याचे आदेश रद्द केल्यानंतर शनिवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली.
वरळी परिसरातल्या खान अब्दुल गफ्फार खान मार्गावर वरळी सी-फेसच्या सुरुवातीलाच असलेल्या सुमारे दोन हजार चौरस फुटांच्या जागेत 2007 मध्ये एक अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. या जागेत कॅफे सी-फेस (हॉटेल तवा) हे उपहारगृह होतं.
या उपहारगृहाचा तळमजला साधारणपणे दोन हजार चौरस फूट, तर पहिला मजला हा सुमारे एक हजार 500 चौरस फूट होता. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement