एक्स्प्लोर
भाजपचं मिशन 2019, महाआघाडीविरोधात शक्तीप्रदर्शन
देशभरात लोकसभा निवडणुका टप्प्याटप्प्यांमध्ये होणार असल्या तरी भाजपशासित सर्व राज्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी प्रचार करण्याची भाजपने रणनीती आखली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपने शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय आधिवेशनानंतर आता प्रत्येक राज्यात विविध कार्यक्रम राबवण्यासाठी संघटनात्मक नेमणुका सुरु करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात युतीचं भवितव्य अजून अधांतरी असलं तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पुढच्या दीड महिन्यात स्वबळावर प्रचाराची नेट प्रॅक्टिस सुरु केली जाणार आहे. 2014 च्या निवडणुकीत हाय टेक प्रचार करुन आणि मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने देशात सत्ता आणली. मात्र 2019च्या निवडणुकीला सामोरे जाताना खालच्या कार्यकर्त्याला कामाला लावण्याची जोरदार तयारी भाजपने सुरु केली आहे
भाजपची प्रचार रणनीती
देशभरात लोकसभा निवडणुका टप्प्याटप्प्यांमध्ये होणार असल्या तरी भाजपशासित सर्व राज्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी प्रचार करण्याची भाजपने रणनीती आखली आहे. यामुळे मोदींविरोधात एकजूट होत असलेल्या महाआघाडीला ताकदीने विरोध करता येणार आहे. तसंच प्रचारात सुसूत्रता, एकवाक्यता आणि मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणे शक्य होईल.
कसा करणार प्रचार?
बाईक रॅली : - 2 मार्चला देशभरात एकाच वेळी बाईक रॅली काढणार. - भगवे झेंडे घेऊन प्रत्येक मतदारसंघातून हजार ते दीड हजार बाईक निघणार. - विशेष म्हणजे सॅटेलाईट इमेजेसने भारताचं चित्र टिपलं जाणार - प्रत्येक मतदारसंघात 300 ते 350 बूथ - एका बुथमधून 5 मोटर सायकल निघणार - मोदी मास्क घालून कार्यकर्ते रॅली काढणार - कमळच्या पणतीचे दिवे घरोघरी वाटणार पन्ना प्रमुख : - पन्ना प्रमुखांना अॅक्टिव्ह करणे. - एका बुथमध्ये 25 पन्ना प्रमुखांची नियुक्ती आणि हजार मतदारांची विभागणी - प्रत्येक पन्ना प्रमुखाला 50 ते 60 मतदारांची जबाबदारी - मतदारांना संपर्क करण्याचे काम सुरु. - मतदार यादीत नाव नोंदणी, नवीन मतदारांची नावं जोडणे, स्थलांतरित किंवा निधन झालेल्या व्यक्तींची नावं तपासणे. - मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे या कामासाठी संघटनात्मक नेमणुका : - एका राज्यात 5 सरचिटणीसांची नेमणूक - प्रत्येक सरचटणीसला एका कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली - 1 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत हे कार्यक्रम राबवले जाणारअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement