एक्स्प्लोर
'खडसेंना पुन्हा मंत्रिपद द्या, अन्यथा आत्महत्या करु'
मुंबई: एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर आता भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ खडसेंना मंत्रिपद परत द्या अन्यथा आत्महत्या करु असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
मुंबई भाजपच्या कार्यालयासमोर आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजीही केली. एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर आरोप झालेत असा दावाही यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर खडसे आणि पंकजा मुंडेंची कोंडी सुरु केल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्यावरुन भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement