एक्स्प्लोर
भाजपचे 227 उमेदवार हुतात्मा स्मारकाला अभिवादन करणार
मुंबई : मुंबई महापालिकेतच्या प्रचारात आता भाजपनंही भावनिक राजकारणाला सुरुवात केली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. मुंबईतील भाजपचे सर्व म्हणजे 227 उमेदवार हुतात्मा स्मारकाला अभिवादन करणार आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण देणाऱ्या या स्मारकाच्या अभिवादनानंतर उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ दिली जाणार आहे. भाजपकडून मुंबई तोडण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप होत आहे. तो दावा खोडून काढण्यासाठी भाजपनंही आता नव्या रणनीतीची सुरुवात केली आहे.
दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या सर्व उमेदवारांचा मेळावा होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत या सर्वांना पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ दिली जाईल.
दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement