एक्स्प्लोर

भाजप राज्य कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना राज्यात स्थान नाही; तर खडसे, मेहता, तावडे विशेष निमंत्रित सदस्य

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात पंकजा मुंडे यांना राज्यात स्थान दिलं नसून त्यांना केंद्रात जबाबदारी देणार असल्याचं जाहीर केलं. तर एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, विनोद तावडे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. आजच्या कार्यकरिणीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पक्षविरोधी नाराजी व्यक्त करणाऱ्यांना महत्त्वाचे स्थान नसेल हे पक्षाने आज स्पष्ट केलंय. या यादीवर पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असल्याचंही यादीवर नजर टाकल्यावर स्पष्ट होतंय.

एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान दिलंय खरं. पण हे स्थान म्हणजे केंद्राप्रमाणे राज्यातले मार्गदर्शक मंडळ असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी मिळणार असं म्हणत राज्यात त्यांना स्थान नसणार हे सूचित केले आहे. पंकजा यांच्या बहिण खासदार प्रीतम मुंडे यांना उपाध्यक्ष पद देऊन मुंडे कुटुंबियांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. तर एकनाथ खडसे यांच्या सून आणि खासदार रक्षा खडसे यांना चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कोथरूडची विधानसभेची जागा गमावल्यानंतर अश्रू अनावर झालेल्या मेधा कुलकर्णी यांनाही प्रदेश कार्यकारिणी सदस्य पद देऊन पुन्हा डावलल्याचे चित्र आहे. कोषाध्यक्ष पदी मिहीर कोटेचा यांना स्थान देऊन शायना एनसी यांना केंद्रात पाठवण्याचे संकेत दिले आहे.

तुकाराम मुंढे या व्यक्तीचा विरोध नाही, तर त्यांच्या वृत्तीचा विरोध : महापौर संदीप जोशी

पक्षविरोधी भूमिका घेतली नाही अशांना संधी असं असलं तरी पक्षात मागील पाच वर्षांच्या सत्ता काळात ज्यांना संधी मिळाली नाही किंवा ज्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना होती मात्र तरीही पक्षविरोधी भूमिका घेतली नाही अशांना संधी दिल्याचं यातून दिसून येत आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे यांची प्रदेश महामंत्री पदी वर्णी लागली आहे. तसेच माजी मंत्री राम शिंदे आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांची उपाध्यक्ष पदी वर्णी लावून नाराजी दूर करण्यात आली आहे.

भाजप राज्य कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना राज्यात स्थान नाही; तर खडसे, मेहता, तावडे विशेष निमंत्रित सदस्य भाजप राज्य कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना राज्यात स्थान नाही; तर खडसे, मेहता, तावडे विशेष निमंत्रित सदस्य

विधानसभेत डावललेले कल्याण - डोंबिवलीचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना भटके विमुक्त मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच माजी आमदार आणि युवा मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर यांना ओबीसी मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त करुन तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. लातूर मधून तिकीट कापलेल्या सुधाकर भालेराव यांना अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्ष पदी तर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचे पुनवर्सन किसान मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त करून केले आहे.

पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी देणार : चंद्रकांत पाटील

विशेष म्हणजे महिला मोर्चा अध्यक्ष पदासाठी पिंपरी चिंचवडमधून उमा खापरे आणि युवा मोर्चा अध्यक्ष पदी पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड अनपेक्षित होती. कारण या दोन्ही पदांसाठी मेधा कुलकर्णी, चित्र वाघ, मनीषा चौधरी, भारती लवेकर आणि युवासाठी आमदार राम सातपुते यांची नावं चर्चेत होती.

एकंदरीत सत्तेतून पायउतार झाल्यानंतर या नवीन कार्यकारिणीत आयारामांची भुरळ पडलेल्या भाजपने यंदा निष्ठावंतांना स्थान देऊन गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होत आहे.

Mumbai | BJP Executives | भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर, पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget