एक्स्प्लोर

Tiger Shroff Car Firing Marathi News: टायगर प्लिज बाहेर ये...आम्ही कधीपासून थांबलोय...गेटबाहेरुन आवाज; हल्ला होण्याआधीचा थरकाप उडवणारा VIDEO

Tiger Shroff Car Firing Marathi News: मुंबईत जुहू पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटरवर अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार झाला.

Tiger Shroff Car Firing Marathi News: मुंबईत जुहू पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटरवर अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या गाडीवर गोळीबार झाला. बाईकवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर दहा गोळ्या ( (Tiger Shroff Car Firing) झाडल्या. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुखरूप असला तरी त्याचा कारचालक फिरदोस आणि एक रिक्षाचालक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी टायगरने स्वतः गाडी चालवल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे घटनास्थळापासून दिग्दर्शक रोहित शेट्टीचे घर अवघे तीनशे मीटरवर आहे. याआधी सलमान खान, रोहित शेट्टी यांच्या घरांवरही गोळीबार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस आयुक्तांना फोन करून कठोर कारवाईचे निर्देश दिलेत, तर मुंबई पोलिसांची आठ पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. (Tiger Shroff Car Firing Marathi News)

टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांची आठ पथकं आरोपींच्या शोधासाठी कुर्ला, वांद्रे, कल्याण आणि दादर रेल्वे स्थानक येथे रवाना झाली आहेत. घटनेनंतर टायगर श्रॉफकडेही पोलिसांनी जुजबी चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर सात गोळ्यांच्या पुंगळ्या पोलिसांनी घटनास्थळाहून ताब्यात घेतल्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळेत या पुंगळ्या पाठवून तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, बिश्नोई गँगने एक ऑडिओ क्लिप जारी करत टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीच, पण या ऑडिओ क्लिपमधून लॉरेन्स गँगने सलमान खानला  धमकी दिली. लॉरेन्स गँगने याआधी सलमान खानच्या घरावरही गोळीबार केला होता. आता पुन्हा धमकी दिल्यानं खळबळ उडाली. अनिल पंडीत आणि हरमन संधू नावाच्या व्यक्तींनी या घटनेची जबाबदारी घेतली आहे. तर या ऑडिओ क्लिपची पुष्टी एबीपी माझा करत नाही.

टायगर प्लिज बाहेर ये..आम्ही कधीपासून थांबलोय, गोळीबार होण्याआधीचा थरकाप उडवणारा VIDEO:

टायगर श्रॉफवर गोळीबार होण्याआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये टायगर फुटबॉल खेळून आल्यानंतर कारमध्ये बसण्याआधी काही सेकंद उभे राहून पापाराझींना फोटो दिले. यावेळी टायगर मैदानाच्या गेटच्या आतमध्ये उभा होता. परंतु काहीजण टायगर प्लिज बाहेर ये..आम्ही कधीपासून थांबलो आहोत. मस्त दिसतोय..थोडं बाहेर ये...असं कुणीतही हिंदीत बोलत असल्याचं ऐकू येत आहे. मात्र टायगर गेटच्या बाहेर आला नाही. कारमध्ये बसला आणि कारमधूनच मैदानाबाहेर पडला आणि याचवेळी टायगरवर आरोपींकडून 10 राऊंड फायर झाले. त्यामुळे टायगर थोडक्यात बचावल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओही समोर आला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Chauhan (@sunny_chauhan_vlogs)

नेमकं काय घडलं? (Tiger Shroff Car Firing Marathi News)

  • रविवार (18 ऑक्टोबर) संध्याकाळ सातची वेळ...अभिनेता टायगर श्रॉफ नेहमीप्रमाणे जुहूच्या पुष्पा पार्क येथील फुटबॉल मैदानावर आला होता टायगर श्रॉफ आल्यामुळे नेहमीप्रमाणे चहाते देखील होते.
  • 7 वाजताच्या आसपास टायगर श्रॉफ आपल्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून आपल्या चाहत्यांचा निरोप घेऊन मैदानावरून बाहेर पडलाच होता की चाहत्यांच्या गर्दीत मिसळलेल्या दोघांनी अचानक आपापल्या बंदुका बाहेर काढल्या आणि टायगरच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. 
  • दहा राऊंड या दोघांनी फायर केल्याची माहिती आहे. 
  • गोळीबार करताना एकाची बंदूक अडकली तर दुसरा मात्र गोळीबार करतच राहिला.
  • गोळीबारानंतर दोघेही बाईकवर बसून फरार झाले. 
  • या गोळीबारात टायगर श्रॉफला गोळी लागली नसली तरी गाडीच्या फुटलेल्या काचांमुळे तो जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्या छातीवर तसेच हाताला जखम झाल्याची माहिती आहे. 
  • टायगरच्या गाडीचा चालक फिरदौस हा गोळीबारात जखमी झाला असून उमेश चरण हा त्याचा फॅन देखील जखमी झाला आहे.
  • चाहत्याच्या थेट छातीत गोळी लागली असून त्याला सध्या Kem रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • तर फिरदौसवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
  • गोळीबाराच्या अल्पावधीतच बिश्नोई टोळीच्या अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी एक कथित ऑडिओ क्लिप आणि फेसबुक पोस्ट काढत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. 
  • दरम्यान गोळीबार केल्यानंतर तिघेही अज्ञात हल्लेखोर आपल्या दुचाकी वरून अंधेरीच्या दिशेने फरार झाल्याची माहिती आहे. 
  • तसेच हल्ल्यापूर्वी त्यांनी रेकी देखील केली असून घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरात त्यांच्या हालचाली चित्रित झाल्याची माहिती आहे.
  • जुहू पोलीस ठाण्यात टायगर श्रॉफच्या चालकाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 
  • पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी तब्बल 15 पथक तयार केली असून मुंबई गुन्हे शाखेने देखील समांतर तपास सुरू केला आहे.

संबंधित बातमी:

Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
Anirudh Ravichander and Kavya Maran: काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?
काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
Advertisement

व्हिडीओ

Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Embed widget