एक्स्प्लोर

LIVE : मोदी सरकारने केलेल्या कामावर निवडणूक जिंकणार : अमित शाह

भाजप पहिल्यांदाच स्थापना दिवस साजरा करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिलं आहे.

मुंबई: भाजपने आज स्थापना दिनानिमित्त मुंबईत जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. वांद्रे कुर्ला क्रीडा संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. भाजप पहिल्यांदाच स्थापना दिवस साजरा करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिलं आहे.

लाईव्ह अपडेट

अमित शाह यांचं भाषण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंजेक्शन दिल्यावर राहुल गांधी बोलतात. राहुल गांधी आमच्याकडे तीन वर्षांचा हिशेब मागतात. मात्र त्यांच्या चार पिढ्यांनी काय केलं, हे आधी सांगावं, असा हल्लाबोल भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केला. “राहुल बाबा आजकाल शरद पवारांसोबत बसतात. पावरांनी त्यांना इंजेक्शन दिलंय म्हणून हल्ली खूप उड्या मारत आहेत. राहुल बाबा विचारतात मोदीजी आपने साडे चार साल में क्या किया, पण देश विचारतोय राहुल बाबा चार पीढ्यांपासून तुम्ही काय केले?”, असं टीकास्त्र अमित शाहांनी केलं. केंद्रात आणि राज्यात घोटाळ्याचा एकही आरोप देशभरात भाजपवर कोणी करू शकलं नाही. पूर आल्यावर सर्व लहान मोठे  झुडपं वाहून जातात. पण एकच वटवृक्ष उभं राहतो, त्यावर पाण्याच्या भीतीने सांप, मुंगूस, कुत्रे, मांजरं सगळेच आसरा घेतात; तसे मोदींच्या लाटेसमोर सर्वजण  एकवटले आहेत, असं म्हणत अमित शाहांनी विरोधकांवर टीका केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहचवा आणि 2019 च्या निवडणुकीत पुन्हा महाराष्ठ्रात आणि केंद्रात भाजपचं सरकार निवडून द्या, असं आवाहन अमित शाहांनी कार्यकर्त्यांना केलं.

  • अमित शाह यांच्या भाषणाला सुरुवात
  • तुमच्यामुळे आम्ही आहोत, सगळी पदं तुम्हाला समर्पित : मुख्यमंत्री
  • दलितांना दिलेलं आरक्षण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही : मुख्यमंत्री
  • हे लांडगे सत्तेसाठी दंगली घडवतील, तेढ निर्माण करतील : मुख्यमंत्री
  • चहावाल्याच्या नादी लागू नका, 2014 ला नादी लागलात त्याचं काय झालं ते सर्वांनी पाहिलं : मुख्यमंत्री
  • मुख्यमंत्र्यांकडून भाषणात बाळासाहेबांचा उल्लेख
  • भाजप पक्ष राज्यात ज्यांनी वाढवला, त्या सर्वांना अभिवादन : मुख्यमंत्री
  • शिवराय, आंबेडकरांच्या मनातला महाराष्ट्र घडवायचाय : नितीन गडकरी
  • काही राजकीय नेते म्हणतात की तुम्ही लाखांची चर्चा करता, मी किती काम केलं हे सांगतो, हिंमत असेल तर या शिवाजी पार्कवर, नितीन गडकरी यांचं नाव न घेता राज ठाकरे यांना खुलं आव्हान
  • आशिष शेलार यांचं भाषण
  • मेळावे खूप झाले, सभा खूप झाल्या, घोषणा खूप झाल्या, पण मुंबईत न भूतो ना भविष्य असा भव्य मेळावा भाजप कार्यकर्त्यांमुळे शक्य झालेला आहे.
  • आझाद मैदान 1 लाख 31 हजार चौरस मीटरचं आहे, त्याच्या 40 टक्क्यात गर्दी झाली तरी भव्य मोर्चा म्हटला जातो
  • शिवाजी पार्क 96 हजार चौरस मीटरचं आहे. ते अर्ध भरलं तरी लोक विराट सभा झाल्याची वल्गना करतात
  • बीकेसी ग्राऊंडची 1 लाख 50 हजार चौरस मीटरची जागा आहे, साधारण 2 लाख चौरस मीटर जागेत 5 लाख कार्यकर्ते जमले आहेत. याला काय म्हणाल?
  • अमित शाह यांचं सभास्थळी आगमन, मंचावर थोड्याच वेळात दाखल
  • हल्लाबोल करणाऱ्यांनी इतके वर्ष स्वतःचा गल्ला भरून घेतला, भुजबळांच्या बाजूला अजून दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता सभास्थळी मंचावर दाखल, मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यात मंचावरच चर्चा
  • नाराज मुंडे समर्थकांना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडून समजावण्याचा प्रयत्न, शांत राहण्याचं आवाहन
  • भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर, एकाही बॅनरवर फोटो नाही, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
  • राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाजपचे कार्यकर्ते मुंबईत दाखल
28 विशेष ट्रेन, विशेष बस राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाजपचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी भाजपने 28 विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती. या ट्रेन पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी आणि वांद्रे या स्थानकात थांबणार होत्या. मात्र विशेष ट्रेन असल्याने त्यांना विलंब झाला. ठाणे स्थानकात जी ट्रेन 9 वाजता येणे अपेक्षित होते, ती पाहिली ट्रेन 1 वाजता अली. त्यानंतर इतर रेल्वे आल्या. या कार्यकार्त्यांना स्टेशन ते बीकेसी मैदानापर्यंत येण्यासाठी खास बेस्ट बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. ठाणे स्टेशनवरुन सुमारे 70 बसेस सोडण्यात आल्या. दुसरीकडे बेस्टच्या 170 बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. ज्या रात्रीपासून सकाळपर्यंत फेऱ्या मारत आहेत. यामध्ये 5 एसी बसचा समावेश आहे. अमित शाहांचं जंगी स्वागत दरम्यान, या कार्यक्रमासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह हे मुंबईत आले आहेत. गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास ते मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीद्वारे त्यांचं जंगी स्वागत केलं. विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. LIVE : मोदी सरकारने केलेल्या कामावर निवडणूक जिंकणार : अमित शाह वाहतूक कोंडीचा फटका, नगरसेविकेचं विमान चुकलं या बाईक रॅलीमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. मुंबईकर सुमारे चार तास वाहतूक खोळंब्यात अडकले होते. दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांचं संध्याकाळचं 6.45 वाजताचं दिल्लीचं विमान चुकलं. आज त्यांच्या मुलीचं दिल्लीत लग्न आहे. त्यासाठी काल संध्याकाळी त्यांना हळदीच्या कार्यक्रमाला पोहचायचं होतं. मात्र वाहतूक खोळंब्यामुळे त्यांचं विमान चुकलं आणि त्यांना 9 वाजता सूर्य फ्लाईटने दिल्लीला जावं लागलं. राजुल पटेल अशा एकट्या नसून अनेकांना या वाहतूक खोळंब्याचा फटका बसला. मेळाव्याची तयारी
  • राज्यातील 80 हजार बूथ प्रमुख
  • 19 विंग, 7 आघाड्यांचे पदाधिकारी

  • 5 हजार सरपंच, 12 जिल्हा परिषदा, 13 महापालिका आणि 72 नगरपालिकांचे लोकप्रतिनिधी

  • आमदार - खासदार, जिल्हा - तालुका अध्यक्ष यांच्यावर प्रत्येकी 5 ते 10 कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी...

  • यासाठी महाराष्ट्रासोबत, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडूतून येणार 28 स्पेशल ट्रेन्स...

  • याखेरीज राज्यभरातून 300 बसेस आणि जिप्स...

  • या सभेसाठी बीकेसी मैदानात 3 स्टेज, 7 मंडप, 5 पार्किंग लॉट, 2 राहण्यासाठी टेंट उभारण्यात आलेत.

  • कार्यकर्त्यांसाठी प्रवास सुरु झाल्यापासून ते पुन्हा घरी पोहचेपर्यंत फूड पॅकेट्स आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या जल्लोष सभेनंतर अमित शाह हे मंत्री, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचं परफॉर्मन्स ऑडिट करणार आहे. कार्यकर्त्यांना ऊर्जा दिल्यानंतर नेत्यांची झाडाझडती घेणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगाव, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगाव, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
Embed widget