एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
युतीसाठी भाजपकडून 50-50 चा फॉर्म्युला
मुंबई: शिवसेना आणि भाजप युतीसाठी दोन्ही नेत्यांची दुसऱ्यांदा खलबतं झाली. मुंबईत ही बैठक झाली.
यामध्ये भाजपकडून युतीसाठी 50-50 चा फॉर्म्युला ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला युतीसाठी मान्य होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
युतीबाबतची दुसऱ्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया, सेना-भाजप नेत्यांनी दिली. तसंच आज रात्री दोन्ही पक्ष एकमेकांना जागांची यादी देणार आहेत.
आजच्या बैठकीत शिवसेनेकडून अनिल परब, अनिल देसाई, रविंद्र मिर्लेकर यांनी उपस्थिती लावली. तर भाजपकडून आशिष शेलार, प्रकाश मेहता आणि विनोद तावडेंनी हजेरी लावली.
अनिल देसाई -
"युतीबाबत आज सकारात्मक चर्चा झाली.
जागावाटपासंदर्भात बोलणी झाली. दोन्ही पक्षांनी सूचना केल्या.
जागांची यादी तयार करुन एकमेकांना द्यायची,
मग त्यावर पक्षातील ज्येष्ठ नेते यादी पाहतील,
आणि अभ्यास करुन मग पुढे बोलणी होतील",
असं अनिल देसाई यांनी सांगितलं.
याशिवाय ज्या जागा भाजपला हव्या आहेत, ती यादी ते देतील, आम्हाला ज्या जागा वाटतील, त्यांची यादी आम्ही भाजपला देऊ शकतो, असंही देसाई यांनी सांगितलं.
गेल्या बैठकीच्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बैठकीला उपस्थित होते. यावेळी मात्र ते हजर नाहीत. आशिष शेलार"मोकळ्या पद्धतीने चर्चा केली.
पारदर्शकता या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे चर्चा झाली.
ते नेते ठरवतील त्यावर आज चर्चा झाली नाही.
दहिसर ते मुलुंड चर्चा केली. दोन्ही पक्ष ज्या जागा जिंकू शकतील,
अशा जागांचा प्रस्ताव आम्ही एकमेकांना देणार आहोत",
असं भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे - मुख्यमंत्र्यांची फोनवरुन चर्चा भाजप आणि शिवसेनेमधल्या युतीच्या चर्चेचं घोडं ज्या पारदर्शकतेच्या अजेंड्यामुळं अडलं आहे, त्यावर आता फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चर्चा करणार आहेत. फोनवर झालेल्या चर्चेनंतर उद्धव आणि मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून खलबतं सुरूच राहणार आहे. संबंधित बातम्यामहापौर स्नेहल आंबेकरांच्या उमेदवारीला विरोध
पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा
शिवसेनेच्या 'डीड यू नो'ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सवाल
राज्य आणि केंद्रातही पारदर्शकता हवी : शिवसेना
शिवसेना-भाजपमधील आज होणारी बैठक रद्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement