एक्स्प्लोर

Jaikumar Gore : आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

भाजप आमदार जयकुमार गोरेंना (Jaikumar Gore) हायकोर्टानं दणका दिला आहे. जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे.

Jaikumar Gore : भाजपाचे आमदार जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर करत हायकोर्टानं त्यांना दणका दिला आहे. मात्र, या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं या निकालाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. दोन आठवडे जयकुमार गोरे यांच्या विरोधात अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोरेंविरोधात जमिनीचा खोटी कागदपत्र बनवून फसवल्याचा आरोप आहे.

जमिनीचा खोटी कागदपत्र बनवून फसवल्याचा आरोप प्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टानं दणका दिला आहे. जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळून लावल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं या निकालाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. त्यामुळं पुढील दोन आठवडे तरी गोरेंविरोधात अटकेची कारवाई होणार नाही. वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेंच्या अटकपूर्व जामीनावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती वीरेंद्रसिंह बिश्त यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

नेमकं प्रकरण काय आहे 

मायणी गावातील एका जमिनीसंदर्भात बोगस कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (विरळी), महेश पोपट बोराटे (बिदाल) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका तलाठ्याचाही समावेश असून, तो फरार आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी पोलिसात फौजदारी तक्रार दिली आहे. या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वडूज सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो न्यायालयानं फेटाळल्यानंतर गोरे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आपण कोणतीही फसवणूक केलेली नसल्याचा दावा जयकुमार गोरे यांच्या वतीनं कोर्टापुढे करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi In Mumbai Thane Pune 2026: गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
Maharashtra Residential Schools:नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
Ghatkopar Dahihandi Row : मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी
मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Embed widget