एक्स्प्लोर

जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या श्रमाचीच चौकशी करणार काय? : आशिष शेलार

राजकीय सूडबुध्दीने सुरु आहे, कुहेतू यामागे आहे. पण होऊ दे चौकशी हातच्या कंगणाला आरसा कशाला. अहवाल आल्यावर आघाडी सरकार तोंडावर आपटेल, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांसाठी संजीवनी म्हणून ठरलेली जलयुक्त शिवार योजना ही जनचळवळ झाली. लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना गावागावात पोहचली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांनी या योजनेत केलेले श्रम अपार आहेत. तुम्ही या श्रमिकांच्या श्रमाची चौकशी करणार काय? असा सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात झाला. याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, हे राजकीय सूडबुध्दीने सुरु आहे, कुहेतू यामागे आहे. पण होऊ दे चौकशी हातच्या कंगणाला आरसा कशाला. अहवाल आल्यावर आघाडी सरकार तोंडावर आपटेल, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. ज्या पद्धतीने मेट्रो कारशेडसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर आघाडी सरकार तोंडावर पडले तसेच याही चौकशीतून होईल. आज आम्ही मेट्रो कारशेडचा खरा अहवाल उघड केला. सरकारचा हट्ट उघडा पाडला त्यामुळे हे उघडे पडले ते झाकण्यासाठी आता अशा धडपडी सुरु आहेत, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यात जलयुक्त शिवारची एकूण 6,41,560 कामे झाली. त्यापैकी कॅगने तपासलेली कामे 1128 इतकी आहेत. म्हणजेच केवळ 0.17 टक्के कामांवरून कॅगने संपूर्ण जलयुक्त शिवारचे केलेले मूल्यमापन विश्वासार्ह कसे ठरेल? याचा अर्थ 99.83 टक्के कामं तपासलीच नाहीत. जलयुक्त शिवारची कामे 22,589 गावांमध्ये झाली. त्यातील कॅगने तपासली केवळ 120 गावांमध्ये. याचा अर्थ केवळ 0.53 टक्के गावं पाहिली गेली. 99.47 टक्के गावांमध्ये न जाताच तयार केलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक नव्हता. तसेच या अहवालात भ्र्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. कामे 98 टक्के पूर्ण झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे ज्या मंत्रिमंडळात ही योजना मंजूर झाली त्या मंत्री मंडळात शिवसेनाही सहभागी होती. त्यामुळे कोण कुणाची चौकशी करतेय? तेही एकदा जनतेला सांगा, असा टोला त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच

व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना प्राचीन संस्कृतीकडून असं उत्तर देऊ जे विसरु शकणार नाही, इराणचं ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर
तुम्हाला असं उत्तर देऊ ते तुम्ही विसरु शकणार नाही, संस्कृती संपवण्याची धमकी देणाऱ्या ट्रम्पना इराणचं उत्तर
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल

Embed widget