एक्स्प्लोर
पंतप्रधानांचा आदेश धुडकावला, मुलांसाठी भाजप नेत्यांचं लॉबिंग
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील सभेत कुटुंबातील व्यक्तीसाठी तिकीट मागू नका, असं भाजप नेत्यांना बजावलं होतं. मात्र हे मुंबई भाजप नेत्यांना पचनी पडलेलं दिसत नाही. कारण मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप नेते, आमदार आणि खासदारांनी आपल्या मुलांना तिकीट मिळावं यासाठी लॉबिंग सुरु केलं आहे.
एरव्ही गांधी घराण्यावरुन काँग्रेसवर कायम टीका करणाऱ्या भाजप नेत्यांची मात्र मुलांना तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसपाठोपाठ भाजपातही घराणेशाहीची परंपरा शिरकाव करत असल्याच दिसत आहे.
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. उमेदवारी कोणाला द्यायची, तिकीटवाटप कसं करायचं यासाठी भाजपने समितीही नेमण्यात आली आहे. निवडणूक जवळ आल्याने इच्छूकांनी आपापल्या मतदारसंघात कार्यक्रम सुरु केले आहेत. नील सोमय्या मुलुंड, हर्ष मेहता घाटकोपर तसंच आकाश पुरोहित यांची कुलाबामध्ये कार्यक्रम सुरु आहेत.
मुलांसाठी लॉबिंग सुरु असलेले भाजप नेते...
किरीट सोमय्या (खासदार) नील सोमय्या मुलुंड
प्रकाश मेहता (गृहनिर्माण मंत्री) हर्ष मेहता घाटकोपर
राज पुरोहित (आमदार) आकाश पुरोहित कुलाबा
विद्या ठाकूर (महिला, बालकल्याण राज्यमंत्री) दीपक ठाकूर गोरेगाव
रमेश ठाकूर (माजी आमदार) सागर ठाकूर गोरेगाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement