एक्स्प्लोर
भाजपमधील नाराज नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात, अजित पवारांचे संकेत
भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. त्याचे पडसाद महाराष्ट्रात दिसू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या विरोधकांच्या गोटात घरवापसीचे वारे वाहू लागले आहेत तर भाजपने सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
2014 मध्ये काँग्रेस विरोधात वारे सुरू झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील अनेक दिग्गजांनी बुडत्या जहाजातून उडी मारली आणि पक्ष बदलले. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु 2019 येईपर्यंत भाजपची लाट ओसरु लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लोकांच्या मनात भाजप सरकारविषयी रोष असताना काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा घरवापसीच्या प्रतीक्षेत आहे. तशी चाचपणी गेले अनेक दिवस सुरू आहे.
दरम्यान खान्देशातील भाजपमधील एक मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे. तसेच काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले पुन्हा काँग्रेसमध्ये जाता येत नाही, म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश घेऊ शकतात. तसेच शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले नेते सेना-भाजपमध्ये युती होत असल्याने काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement