Kirit Somaiya : शौचालय घोटाळ्याचा आरोप; कारवाईआधीच सोमय्यांकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न
Kirit Somaiya On Toilet Scam : शौचालय घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार संजय राऊत यांनी विविध खात्यांना पत्र लिहीत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.
Kirit Somaiya On Toilet Scam : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर सोमय्या यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाकडून कारवाई होण्याआधीच सोमय्या यांनी विविध विभागांना पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट केली आहे. सोमय्या यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
किरीट सोमय्या यांनी नगर विकास खात्याचे सचिव, एमएमआरडीए, मुंबई पोलीस, मीरा-भाईंदर पोलीस, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वन खाते आदी विभागांना त्यांनी पत्र लिहीले आहे. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. कोणत्या आधारावर 100 कोटींचा घोटाळा झाला असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला. हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता. जमीन देखील सरकारची आहे असेही सोमय्या यांनी म्हटले. मी माझी बाजू आपली स्पष्ट करत नसून यातील सत्यस्थिती सांगत असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
काय आहे टॉयलेट घोटाळा?
मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साढे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरू केली आहे. महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी ही 18 मार्च 2021 रोजी शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता मेधा सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- बेकायदेशीर इमारतीला वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांचे आपल्यावर खोटे आरोप; प्रवीण कलमेंचे प्रत्युत्तर
- Sanjay Raut : 'महाराष्ट्रात जामिनाचा घोटाळा सुरु, सोमय्यांना तुरुंगात जावंच लागणार'; राऊतांचा पलटवार