BJP Leader Kirit Somaiya will be visiting Korlai in Alibag : 19 बंगल्यांवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे परिवारावर आरोप सुरुच ठेवले आहेत. आज ते कोर्लई गावाला भेट देणार आहेत. त्याआधी बोलताना सोमय्या यांनी म्हटलं आहे की, गेल्या 17 महिन्यांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत आहोत. मला त्या ग्रामपंचायतीनंच माहिती दिली आहे. त्यांनी जी कागदं दिली आहेत त्यावरुनच आम्ही बोलत आहोत. आम्हाला वास्तविकता काय झालं हे समजून घ्यायचं आहे. काय झालंय हे आम्हाला मुख्यमंत्र्यांनीच सांगावं. ते खोटं बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्री साहेब चुका होतात.  फक्त जनतेला सांगा की मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. 


परवानगी नाही दिली तर निवेदन देणार 


किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे की, प्रशासनानं आम्हाला अडवलं तर आम्ही काहीही विरोध करणार नाहीत पण कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते अडवत असतील तर मात्र काय होईल हे सांगू शकत नाही. 19 बंगले ठाकरे आणि वायकर परिवाराचे आहेत. जर हे बंगले त्यांचे असतील तर ते त्यांच्या संपत्तीमध्ये का दाखवण्यात आले नाहीत. मला कोर्लईमध्ये आधीही गेलो होतो त्यावेळीही तिथल्या सरपंचांनी विरोध केला होता. हे खरं आहे की नाही याचं स्पष्टीकरण ठाकरे परिवारानं द्यायचं आहे. घरं चोरीला गेली की गायब झाली हे ठाकरे परिवारानं सांगायचं आहे. जनतेला त्यांनी सत्य सांगावं, असं त्यांनी म्हटलं आहे.


वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहे


किरीट सोमय्या म्हणाले की,  घरे आहेत की नाही ही वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहे.  ही घरे चोरीला गेली की वाहून गेली हे जनतेला जाणून घ्यायचे आहे.  जानेवारी 2019 मध्ये ठाकरे सरकारने पत्र दिले.  रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांच्या नावाने घरे करावी असे पत्र दिले.  12 नोव्हेंबर 2020ला आर्टिजीएसने खात्यात पैसे ट्रान्सफर झाले  सप्टेंबर 2020 पासून मी पाठपुरावा करत आहे.  ग्रामपंचायत कार्यालयात जी कागदं दिली आहेत त्याचा एकदाही उद्धव ठाकरे यांनी इन्कार केलेला नाही, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 


सोमय्या म्हणाले की, अमरावती, कोल्हापूर आणि पुण्यात तर 100 गुंड आले होते तरी सोमय्या उभा आहे.  आम्ही कुणीही आज दंगल करणार नाही.  प्रशासन बोलले तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तर मी त्यांच्या हातात पत्र देऊन येणार असं ते म्हणाले. 


किरीट सोमय्या आज कोर्लई गावात भेट देणार


रायगडच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले आहेत, असा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आज या गावात भेट देणार आहेत. यावेळी सोमय्या यांना शिवसैनिक विरोध करण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या या जागेवर एकही बंगला नसल्याचं कोर्लईच्या सरपंचांनीही स्पष्ट केलंय. तरीही किरीट सोमय्या त्यांच्या आरोपांवर ठाम आहेत. यावरून सोमय्या आणि शिवसेनेत संघर्ष सुरु असताना सोमय्या यांनी आज कोर्लईत जाण्याची घोषणा केलीय. त्यामुळे कोर्लईत आज शिवसेना आणि सोमय्या यांच्यात सामना रंगण्याची चिन्हं आहेत.


इतर संबंधित बातम्या


महाआयटीत 25 हजार कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप, 25 हजार कोटींचा घोटाळा कसा? BJP चा सवाल


Amol Kale : महाआयटी घोटाळा प्रकरण: संजय राऊतांनी आरोप केलेल्या अमोल काळेंनी म्हटलं, देश सोडून...